आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसावळ - रविवारी (दि. ६) आमच्या कुटुंबावर झालेल्या हल्ल्यानंतर हल्लेखाेरांनी वडीलांना संपवल्यानंतर त्यांच्या गळ्यातील साेन्याची साखळी काढून घेतली. ती हातात फिरवत हल्लेखोरांनी फाेन लावला आणि ‘बाॅस काम हाे गया, गाडी भेज दाे’ असे म्हणत ते निघून गेले. त्यामुळे तिन्ही हल्लेखाेरांच्या मागे राजकीय व्यक्तीचे पाठबळ आहे. त्या ‘बाॅस’चा शाेध घेऊन या हत्याकांडामागील सूत्रधाराला पाेलिसांनी समाेर आणावे, खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा, अशी मागणी खरात कुटुंबातील सदस्यांनी सायंकाळी त्यांच्या घरी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. पाेलिस वेळीच घटनास्थळी पाेहोचले असते तर आमचे वडील वाचले असते, असा आराेप खरात कुटुंबातील सदस्यांनी केला.
माहिती देताना आतीष खरात आणि राजकुमार खरात हे दोन्ही भाऊ म्हणाले की, रविवारी आमचा दिवस नेहमीसारखा हाेता. त्याच वेळी घरातील फोन वाजला आणि तुझ्या भावाला मारले असून लाल चर्चजवळ तत्काळ येण्याची सूचना समोरील व्यक्तीने केली. चर्चजवळ पोहोचताच दुभाजकाजवळ आमचा भाऊ साेनू रक्ताच्या थाराेळ्यात पडलेला दिसला. जवळच प्रेमसागरचे आतडे बाहेर काढले हाेते. आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी रिक्षा थांबवल्या मात्र काेणीही थांबले नाही. त्यावेळी एक आेमिनी थांबवून त्यात शहरातील चार हाॅस्पीटलमध्ये जखमींना नेले. शेवटी डाॅ. मानवतकर हाॅस्पीटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्याचवेळी पुन्हा फाेन आला, तुमच्या वडीलांवरही हल्ला करण्यात आला आहे. भाऊ हंसराज, आई रजनी खरात हे जखमी झाले आहेत. तुम्ही जिथे आहे तेथेच थांबा, घराकडे येऊ नका, असे समोरील व्यक्तीने सांगितले. त्यामुळे जखमी भावांना सांभाळावे की वडिलांना वाचवण्यासाठी जावे, असा प्रश्न पडल्याचे खरात बंधूंनी सांगितले.
फोनवर मिळतात धमक्या, कुटुंबीयांचा आरोप
आम्हाला या घटनेचा बदला घ्यायचा नाही, आमचा न्याय देवतेवर विश्वास आहे. त्यामुळे आम्ही काेणाशीही वाद घालणार नाही. दु:खाच्या प्रसंगात आम्हाला भेटण्यासाठी अनेक जण येत आहे. मात्र ते जाताना कानात सांगत आहेत की, आता तुम्हीच राहीले आहात, पुढचा नंबर तुमचाच आहे. त्यासोबतच फोनवरदेखील अनेकजण धमकावत आहेत. खाेट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली जात आहे. त्यामुळे आम्ही चारही भावांनी भुसावळ साेडून जाण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या ठिकाणी आम्हाला कुणीही ओळखत नाही, अशा ठिकाणी आम्ही जाऊ, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.