आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुपरहिट मल्याळम ‘अंगमली डायरीझ’च्या मराठी रिमेकमध्ये दिसणार भूषण पाटील

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. एका प्रादेशिक भाषेतील चित्रपटाचा रिमेक दुस-या प्रादेशिक भाषेत होणे हे कौतुकाचं आहे कारण यामुळे एखादी सुंदर, मनोरंजक आणि वेगळेपण जपणारी कलाकृती अथवा चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यास सोपे होते.

 

मल्याळम भाषेत सुपरहिट ठरलेल्या ‘अंगमली डायरीझ’ या चित्रपटाचा मराठी रिमेक बनवण्यात आला आहे.  ‘कोल्हापूर डायरीझ’ या मराठी रिमेक मधील अभिनेता भूषण नानासाहेब पाटीलच्या लूकची झलक डिजीटल मिडीयाच्या माध्यमातून नुकतीच दाखवण्यात आली आहे. अवधूत गुप्ते प्रस्तुत ‘कोल्हापूर डायरीझ’ या चित्रपटाचे दिग्दर्शन जो राजन यांनी केले आहे.

 

मूळचा धुळेचा असणारा भूषण नानासाहेब पाटील याने १८ नोव्हेंबरला त्याचा वाढदिवस साजरा केला आणि त्याच्या वाढदिवसाच्यादिवशी भूषणला डिजीटल मिडीयावर प्रदर्शित झालेला त्याच्या नव्या चित्रपटातील नवा लूक हे खास सरप्राईज मिळाले.  हे सरप्राईज जसे भूषणसाठी खास होते तसेच ते प्रेक्षकांसाठी देखील खास ठरले आणि भूषणच्या नव्या लूकला प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे त्याचा वाढदिवस अजून स्पेशल बनला.

 

सुपरहिट ठरलेल्या मल्याळम चित्रपटाच्या ‘कोल्हापूर डायरीझ’ या मराठी रिमेकमध्ये भूषण प्रमुख भूमिकेत दिसणार असून आता त्याच्या लूकची चर्चा होणार आणि प्रेक्षकांची उत्सुकता देखवील वाढणार हे नक्की.

बातम्या आणखी आहेत...