Worldcup2019 / WolrdCup/ भारताला शिखर धवननंतर दुसरा मोठा धक्का, स्नायुंच्या दुखापतीमुळे भुवनेश्वर कुमार पुढील 3 सामन्यासांठी बाहेर, शमीला मिळणार संघात स्थान


भारताच्या विजयात पूर्ण संघाचे योगदान- कोहली

दिव्य मराठी वेब

Jun 17,2019 05:20:25 PM IST

मॅनचेस्टर- भारताचा वेगवान गोलांदाज भुवनेश्वर कुमार रविवारी पाकिस्तानविरूद्ध झालेल्या सामन्यात स्नायुंमध्ये आलेल्या तणावामुळे जखमी झाला आहे. भारतीय संघाच्या विजयानंतर कर्णधार विराट कोहलीने पत्रकार परिषदेत भुवनेश्वर पुढील 2 ते 3 सामन खेळू शकणार नाही, अशी माहिती दिली. त्याचा जागेवर आता वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला संघात जागा देण्यात आली आहे.


भुवनेश्वरच्या जखमेचा अंदाज यावरून लावता येईल की, तो त्याची तिसरी ओव्हरी पूर्ण करू शकला नाही आणि फक्त 2 चेंडू टाकून मैदानातून बाहेर गेला. मैदानातून बाहेर गेल्यानंतर त्याच्या जगी विजय शंकरला ओव्हर देण्यात आली. त्यानंतर तो परत त्या सामन्यात खेळू शकणार नाही अशी बातमी बाहेर आली.


शिकर धवन नंतर संघाला दुसरा मोठा झटका
सामन्यानंतर कोहली म्हणाला, "भुवनेश्वर गोलंदाजीदरम्यान एका फुटमार्कवरूर घसरून पडला. तो सध्या 2 ते 3 सामन्यांसाठी संघाच्या बाहेर राहणार आहे, पण आम्हाला आशा आहे की, तो लवकरच परत येईल. तसेच शमी संघात आल्यामुळे खूप उत्साहीत आहे." भारताचे पुढील तीन सामने अफगानिस्तान(22 जून), वेस्टइंडीज(27 जून) आणि इंग्लंड(30 जून)सोबत आहेत. त्यामुळे शिखरनंतर भुवनेश्वर बाहेर जाणे हे भारतासाठी मोठे नुकसान आहे.


भारताच्या विजयात पूर्ण संघाचे योगदान- कोहली
कोहलीने सलामीवीर रोहित शर्माचे कौतुक केले आहे, तो म्हणाला की, रोहीतने परत एकदा चांगली कामगिरी केली आहे. के.एल. राहुलनेही त्याला चांगली साथ दिली. रोहितने दाखवले की, तो का एक चांगला वन-डे खेळाडून आहे. 336 च्या स्कोरपर्यंत पोहण्यासाठी संपूर्ण संघाचे योगदान राहीले आहे. कोहलीने कुलदीप यादव परत फॉर्ममध्ये आल्यामुळे आनंद व्यक्त केला आहे.

X
COMMENT