आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्ज फेडण्यासाठी तरुण बनला दुचाकी चोरटा, अकोट शहर पोलिसांकडून चोरांच्या टोळीचा छडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोट - समाजातील चांगल्या घरातील तरुण मुले किरकोळ कारणावरून चोरी सारख्या गंभीर गुन्ह्याकडे वळत असून त्यामध्ये उच्च शिक्षण घेतलेली तरुण मुले सुद्धा सामील असल्याचे वास्तव अकोट शहर पोलिसांनी उघडकीस आणले. एका चोरीच्या गुन्ह्यातून समोर आले असून समाज व पालकांनी अंतर्मुख होऊन विचार करणे आवश्यक आहे हेच ह्या घटनेने अधोरेखित केले. 

 

पोलिस स्टेशन अकोट शहर येथे फिर्यादी राजेश वासुदेव राव वानखेडे राहणार राजदे प्लॉट अकोट, यांनी फिर्याद दिली होती की ते राहत असलेल्या पुर्वाज अपार्टमेंट मधील पार्किंग मधून त्यांची हिरो होंडा दुचाकी क्रं. एमएच ३० एडी ७८४६ किंमत ४९ हजार ही कोणी तरी अज्ञात व्यक्तीने चोरली होती, सुरुवातीला त्यांनी शोध घेतला न सापडल्यानेे शहर पोलिस स्टेशन येथे फिर्यादीवरून पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला, तपास सुरू असताना ,शहर च्या गुन्हे शोध पथकाला माहिती मिळाली की शहरातील टाकपूरा येथे राहणार धनराज उर्फ गुड्डू महेश जोशी हा विना कागदपत्रांच्या दुचाकी विकत आहे, त्या वरून त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता पुढे आलेली माहिती अशी की तो बीएस्सी कॉम्प्युटर झाला असून दीड वर्षा पूर्वी पुणे येथे नोकरीला लागला होता, परंतु कंपनीत पगार कमी होता, त्यातच सिल्वासा येथे जाताना तो चालवत असलेल्या त्याचे मित्राच्या चारचाकी वाहनाला अपघात झाला व कार चे बरेच नुकसान झाले, ते नुकसान भरून देण्या साठी त्याने, अकोला येथील एका व्याजाने पैसे देणाऱ्या व्यक्तीकडून २० हजार रुपये कर्ज घेतले, ते कर्ज १ वर्षाच्या आत फेडू न शकल्याने व पैशाची व्याजासह परतफेड करण्याचा तगादा सुरू झाल्यामुळे, सर्व प्रथम अकोला येथील बसस्टँड जवळून मोटार सायकल चोरली व १७ हजारात अकोटला विकली, त्यानंतर अशा आणखी तीन मोटार सायकली , अकोट मधीलच त्याचे मित्र वैभव मोझेस गायकवाड वय २२, राहणार हिवरखेड रोड अकोट, प्रणय अनिल गोरे वय २०,राहणार जलतारे प्लॉट अकोट यांचे मदतीने चोरल्या , त्याने दिलेल्या कबुलीवरून इतर २ आरोपींना सुद्धा अटक करण्यात आली असून त्यांचे कडून १ हिरोहोंडा प्लेझर मोटारसायकल क्रमांक एमएच३०एडी ७८४६ किंमत ४९ हजार, होंडा ड्रीम योगा मोटारसायकल खोटा क्रमांक टाकलेला किंमत ५० हजार, दुचाकी खोटा क्रमांक टाकलेली किंमत ५० हजार, हिरो होंडा सीडी डिलक्स किंमत ३० हजार अशा एकूण १,७९,००० रुपयांच्या ४ दुचाकी जप्त केल्या असून तिन्ही आरोपींना न्यायालया समोर उभे करून पोलिस कोठडी घेऊन शहरातील चोरी गेलेल्या दुचाकीचा छडा लावणार आहे ही कारवाई शहरचे पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांचे मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाने केली 

बातम्या आणखी आहेत...