आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेदरलँडमध्ये सायकल चालवण्यावर करात सूट, देशात 2.3 कोटी सायकली, लोकसंख्या 1.7 कोटी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अॅमस्टरडॅम- नेदरलँडची लोकसंख्या आता सुमारे १.७ कोटी इतकी आहे. तर सायकली २.३ कोटी आहेत. त्या चालविण्यासाठी सरकार करामध्ये १५ % सूट देत आहे. इंधनावर चालणाऱ्या वाहनांचा वापर कमी करण्यासाठी सायकलिंगला प्रोत्साहन देेते आहे. अहवालात म्हटले आहे की, सरकार रस्त्याची उत्तम सुविधा देण्यासाठी प्रयत्न करते आहे. यासाठी ३९ कोटी डॉलर (सुमारे २७०० कोटी रुपये खर्च केले जात आहेत.

 

यामुळे पुढील तीन वर्षांत २ लाख लोकांनी सायकलचा वापर करावा, यावर भर दिला जात आहे. याशिवाय सरकार सायकलवरून कार्यालयात जाणाऱ्या लोकांना प्रति किमी ०.२२ डॉलर म्हणजे १५ रुपये प्रति किमी सूटही देत आहे. 

 

२५ टक्के नागरिक दररोज करतात सायकलचा वापर
नेदरलँड सायकल चालविण्यास प्रोत्साहन देणारे युरोपियन देशात आघाडीवर आहे. इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सपोर्ट पाॅलिसी विश्लेषणाच्या अहवालानुसार, २०१६ मध्ये सुमारे ३७% लाेक सुटीत सायकलचा वापर करत आहेत. तर कामावर जाणारे २५ टक्के लोक सायकल वापरतात. नेदरलँड सरकार आता जास्तीत जास्त लाेकांना पैशाची लालूच दाखवून कारऐवजी सायकल चालविण्यास भाग पाडत आहे. स्थानिक माध्यमानुसार, देशातील ११ मोठ्या कंपन्या सायकलिंगला प्रोत्साहन देत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...