आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Bicyclist Ride Of Young Software Engineer To Deliver Message Of Marathi Literature Festival

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचा संदेश देण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणाची सायकलस्वारी!  

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद : मराठवाड्याचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात जानेवारी २०२० मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाचा प्रचार आणि प्रसिद्धी सर्वदूर व्हावी यासाठी सॉफ्टवेअर अभियंता तरुणाची विद्येचे माहेरघर असलेले पुणे ते उस्मानाबाद, अशी सायकल फेरी बुधवारी सकाळी ६ वाजता निघणार आहे. साहित्य संमेलनासाठी सॉफ्टवेअर अभियंत्याने स्वीकारलेल्या या अनोख्या उपक्रमाचे स्वागत करण्यासाठी उस्मानाबादकरही उत्सुक आहेत.


उस्मानाबाद येथे पहिल्यांदाच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले जात आहे. त्यानिमित्ताने विद्येचे माहेरघर पुणे ते मराठवाड्याचे प्रवेशद्वार उस्मानाबाद असा सायकल प्रवास करण्याचा संकल्प संगणक अभियंता प्रथमेश तुगावकर यांनी केला आहे. पुणे रेल्वेस्थानक येथून बुधवारी(दि.२०) सकाळी ६ वाजता तुगावकर सायकलसह उस्मानाबादच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. पहिल्या दिवशी सुमारे १०० किलोमीटरचा प्रवास सायकलद्वारे केल्यानंतर भिगवण या ठिकाणी मुक्काम करून दुसऱ्या दिवशीचा मुक्काम कुर्डूवाडी येथे करणार आहेत. तिसऱ्या दिवशी शुक्रवारी(दि.२२) उस्मानाबाद शहरात तुगावकर यांची सायकल फेरी पोहोचणार आहे. साहित्य संमेलनाचा प्रचार आणि प्रसिद्धी, त्यासोबत तरुणाईमध्ये सायकलविषयी आस्था वाढावी, यासाठी त्यांनी हा अफलातून प्रयोग अंगीकारला आहे.
 

बातम्या आणखी आहेत...