आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जैन संत रूपमुनि यांच्‍या अंत्‍यसंस्‍कारासाठी 8 कोटींची बोली, मुखाग्निसाठी 1.94 कोटी रूपये; समजून घ्‍या संतांच्‍या अंत्‍यसंस्‍कारातील बोलीचे महत्‍त्‍व

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाली (राजस्‍थान) - पालीमध्‍ये जैन संत रूपमुनि यांच्‍या महाप्रयाण यात्रेत रविवारी हजारो भक्‍तांनी त्‍यांना अखेरचा निरोप दिला. अंत्‍ययात्रा निघण्‍यापूर्वी रूपमुनि यांच्‍या पार्थिवाला  खांदा देण्‍यापासून ते त्‍यांच्‍यावर अग्निसंस्‍कार करण्‍यापर्यंतच्‍या बोली लावण्‍यात आल्‍या. दुपारी 1 वाजता संत रूपमुनि पंचतत्‍वात विलीन झाले. मुखाग्निसाठी एका भक्‍ताने 1.94 कोटी रुपयांची बोली लावली.  तर खांदा देण्‍यासाठीही लाखो रुपयांची बोली लावण्‍यात आली होती. जैनसंतांची भूतदया तसेच सामाजिक कार्यांसाठी या बोली लावल्‍या जातात.  


असे समजून घ्‍या या बोलींचे महत्‍त्‍व
1. मुंहपति: 21 लाख 94 हजार 111 रूपये
- ही बोली जीवदया तसेच अहिंसेला समर्पित आहेत. यामागे हा भाव असतो की, संतांनी आपल्‍या वाणीवर संयम ठेवत कोट्यावधी सुक्ष्‍म जीवांना वाचविले आहे. त्‍यांच्‍या मुखातून निघालेले शब्‍दही अमरवाणीप्रमाणे असतात.


2 खांदा देणे- 97 लाख 22 हजार 111 रूपये
पुढील डावा खांदा- 32 लाख रुपये
मागील डावा खांदा- 22 लाख रूपये
पुढील उजवा खांदा- 21 लाख 21 हजार 111 रुपये
मागील उजवा खांदा- 22 लाख रूपये

- यामागे असा भाव असतो की, संत यांनी सांसारिक जिवनाचा त्‍याग करून मानव कल्‍याणाचा मार्ग निवडला. याच खांद्याच्‍या जोरावर त्‍यांनी संपूर्ण विश्‍वाला मानवतेचा धडा दिला.


3. चादर: 52 लाख 94 हजार रूपये
- संताच्‍या शरीरातील उष्‍मा ईश्‍वरीय आहे. हीच चादर ओढून मांगलिक संतांनी कोट्यवधी-अब्‍जो नवकार मंत्रांचा जाप दिला. शरीराचा त्‍यागही याच्‍यातच केला. ही एक अलौकिक चादर आहे.


4. गुलाल उछाल: 41 लाख रूपये
- संताच्‍या महाप्रयाण यात्रेत उडणारा गुलाल हा संदेश देता की, हवेत निर्माण झालेल्‍या लालिमेप्रमाणेच मानवानेही जनकल्‍याणाच्‍या कार्यासाठी व मानवतेच्‍या सेवेसाठी स्‍वत:ला समर्पित केले पाहिजे.


5. मुखाग्नि: 1 कोटी 94 लाख रुपये
- साधारणपणे कुटुंबातील व्‍यक्‍तीकडूनच ही क्रिया केली जाते. मात्र संतांचा परिवार तर पुर्ण संसार असतो. या बोलीमध्‍ये रुपरजत परिवारानेच मुलाच्‍या स्‍वरूपात सर्वाधिक बोली लावत त्‍यांना मुखाग्नि दिला.


6. सिक्‍का उछाल: 21 लाख रुपये
- एखाद्या महामानवाच्‍या अंतिम यात्रेत नाणे उधळून म्‍हणेच सिक्‍का उछाल करून हा संदेश दिला जातो की, व्‍यक्‍तीने मोह करू नये. हा संदेश म्‍हणजे नश्‍वरतेच प्रतिक आहे.


सोशल मीडियावर व्‍हायरल झाला 850 कोटी रुपयांच्‍या बोलीचा निराधार मॅसेज
- रुपमुनि यांच्‍या अंतिम संस्‍कारासंबंधी बोली लागण्‍याची प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर सोशल मीडियावर या प्रक्रियेत 850 कोटीहून अधिक बोली लागली, असा मॅसेज व्‍हायरल झाला. मॅसेजमध्‍ये असेही होते की, या निधीतून 100 शाळा, 100 हॉस्पिटल आणि 100 गोशाळांची निर्मिती केली जाणार आहे. मात्र नंतर रूपमती परिवाराने हा फेक मॅसेज असल्‍याचे सांगितले. तसेच यातून जमा होणारा निधी म्‍हणजे गुरूविषयी असलेली आस्‍था आणि त्‍यांच्‍या सेवा प्रकल्‍पांना पुर्ण करण्‍याचे एक माध्‍यममात्र असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.      
 
 

 

बातम्या आणखी आहेत...