आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धुळ्यात भीषण अपघात, ऊसतोड कामगारांचे वाहन नदीत कोसळल्याने 7 ठार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पिकप गाडी बोरी नदीतील खडकाळ भागावर पडून गंभीर अपघात

धुळे- रात्री साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान विंचुर, (तालुका जि. धुळे) येथे विंचुर शिवारात बोरी नदीच्या पुलावरून (एम एच 25-T 3770) या क्रमांकाची ऊसतोड कामगारांना घेऊन जाणारी पिकप गाडी बोरी नदीतील खडकाळ भागावर पडून गंभीर अपघात झाला. या भीषण अपघातात  2 महिला, 1 पुरुष, 2 लहान मुली व2 लहान मुलं असे एकूण 7 व्यक्ती मयत झाले आहेत. 


मृतांची नावे
1) रितेश मेदाराम आर्य (वय वर्ष 8 महीने)
2) जिना बाई अंबु पावरा (वय वर्ष 13 वर्ष)
3) मियाली मेदाराम आर्य (वय 23 वर्ष)
4) रवीना लीलाराम आर्य (वय 5 वर्ष) 
5) करण सेवा सिंग बारेला (वय 3 वर्ष)
6) धरमसिंग सेवा सिंग बारेला (वय 5 वर्ष)
7) लालसिंग अंबू पावरा (वय 20 वर्ष) सर्व राहणार धवलगिरी (तालुका शेंदवा, जिल्हा. बडवानी.) 
          

अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींची नावे 
1) रेल बाई ऊर्फ रेखा सेवा सिंग बारेला (वय 18 वर्ष)
2) गुड्डी बाई तुफान सिंग बारेला (वय तीस वर्ष) 
3) संध्या तुफान सिंग बारेला (वय 14 वर्ष) 
4) राजेश तुफान सिंग बारेला (वय 10 वर्ष) 
5) गुरु भाई तुफान सिंग बारेला (वय 3 वर्ष) असे एकूण पाच व्यक्ती गंभीर जखमी असून एकूण 19 व्यक्ती किरकोळ जखमी आहेत. त्यात 4 पुरुष 3 महिला 6 मुले व 6 मुली आहेत. सर्व जखमींना धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालय, धुळे येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. वाहन चालक सागर भारत तांबारे, राहणार आंदोरा, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद हा फरार झाला आहे.