आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठ्या दुर्घटना आणि घटना...

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
मेक्सिको सीमेवर रिओ ग्रँड नदीत अल्बर्टो आणि मुलगी वेलेरिया - Divya Marathi
मेक्सिको सीमेवर रिओ ग्रँड नदीत अल्बर्टो आणि मुलगी वेलेरिया
  • ईस्टरला मानवतेवर हल्ला, श्रीलंकेमध्ये 200 जणांचा मृत्यू
  • सौदीत जगातील सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोवर हल्ले, उत्पादन ठप्प.
  • जगाचे फुप्फुस म्हटल्या जाणाऱ्या अॅमेझॉनच्या जंगलात 74 हजार ठिकाणी आग

श्रीलंकेत चर्चमध्ये स्फोट : कोलंबो २३ एप्रिलला बॉम्बस्फोट मालिकेने हादरले. ३ चर्चसह ६ ठिकाणी झालेल्या स्फोटांत २०० जण ठार झाले. स्फोट ईस्टरच्या दिवशी झाले होते. भारताशीही त्यांचा संबंध होता. अनेक ठिकाणी छापे पडले. जगात या वर्षी ११२ मोठ्या दहशतवादी हल्ल्यांत २४०० पेक्षा जास्त लोक ठार झाले.

न्यूझीलंडच्या मशिदीत गोळीबारात ५१ ठार : १२ मार्चला न्यूझीलंडच्या क्राइस्टचर्चमध्ये दोन मशिदींवर अतिरेकी हल्ले झाले, त्यात ५१ जण ठार झाले. हा हल्ला २८ वर्षीय ऑस्ट्रेलियन ब्रेंटन टॅरेंट याने घडवून आणला होता.

मेक्सिकोत स्फोट : १९ जानेवारीला मेक्सिकोत तेल पाइपलाइनमधून तेल चोरताना झालेल्या स्फोटात ६६ जणांचा मृत्यू झाला. १४ सप्टेंबरला सौदीत अरामको या जगातील सर्वात मोठ्या तेल कंपनीवर ड्रोनने हल्ला. २ दिवस उत्पादन बंद होते.

जंगलांत आग : ब्राझिल, कॅलिफोर्निया, ऑस्ट्रेलियाच्या जंगलांत आग लागली. ऑगस्टमध्ये जगाचे फुप्फुस म्हटले जाणाऱ्या ब्राझीलच्या अॅमेझॉनमध्ये ७४ हजार ठिकाणी आग लागली.

ब्राझीलमध्ये धरण फुटले : ब्राझीलच्या ब्रुमाडिने शहरात फिजाओ लोखंड खाणीतील धरणे फुटले. १२ किमीपर्यंत चिखल पसरला. ५० जणांचा मृत्यू, ३४५ बेपत्ता, २४ हजार लोक प्रभावित.

अमेरिकेत शरण घेण्यास निघालेले वडील-मुलगी बुडाले

२६ जूनला अमेरिका-मेक्सिको सीमेवरून हे धक्कादायक छायाचित्र आले. अमेरिकेत शरण घेण्यास निघालेले अल्बर्टो रामिरेज आणि त्यांची २३ महिन्यांची मुलगी रिअो ग्रँड नदीत बुडाले. अल्बर्टोंनी एकदा मुलीला नदीपलीकडे सोडले होते, पत्नी तानियाला घेण्यास गेले असता मागून मुलीने उडी मारली. अल्बर्टो मुलीला घेऊन पुन्हा नदी पार करत होते, या वेळी ते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. पत्नी किनाऱ्यावर असहाय अवस्थेत उभी होती.

या फोटोमुळे २०१५ मध्ये समुद्रात बुडालेल्या अॅलन कुर्दी या मुलाची आठवण झाली. तुर्कीत निर्वासितांच्या नौकेत बसलेला अॅलन वडिलांच्या हातातून निसटला होता. छायाचित्र पाहून जग हेलावले होते.

जगात १.२ कोटी लोक निर्वासित : यूएनच्या

यूएनएचसीआरनुसार, जगात १.२ कोटी लोकांनी दुसऱ्या देशात शरणागती घेतली आहे. त्यांना सुविधा मिळत नाहीत. २०२४ पर्यंत या संकटावर तोडगा शक्य नाही.

बातम्या आणखी आहेत...