आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परराज्यातील दारूचा मोठा साठा नगर शहराजवळ जप्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- महापालिका निवडणुकीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने नगर शहराजवळ राज्यात प्रतिबंधीत असलेल्या मद्याचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत ४ वाहने व दारुसह २४ लाख ४१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ४ आरोपींना अटक केली आहे. 


महापालिका निवडणुकीत दारुचा वापर रोखण्याच्या दृष्टीने उत्पादन शुल्क विभागाने कारवाईची मोहीम हाती घेत नगर, पारनेर आणि राहुरी तालुक्यातही मोठी कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर, उपअधीक्षक सी. पी. निकम, निरीक्षक संजय सराफ, ए. बी. बनकर, दुय्यम निरीक्षक एस. एस. भोसले, प्रभारी निरीक्षक एस. आर. कुसळे (श्रीरामपूर विभाग), निरीक्षक अनिल पाटील, कॉन्स्टेबल प्रवीण साळवे, विजय पाटोळे यांच्यासह नगर आणि श्रीरामपूर कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यात नगर, बीड आणि दमण येथील आरोपींचा समावेश आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...