आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Big Art Festival Get Started, 55,000 Artists Participating, Anyone Can Perform Their Art Here

जगातील सर्वात मोठे आर्ट फेस्टिव्हल सुरु, यामध्ये 55 हजार आर्टिस्ट भाग घेत आहेत, कुणीही आपली कला करू शकते सादर 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : स्कॉटलँडच्या एडिनबर्गमध्ये दरवर्षी होणारे जगातील सर्वात मोठे आर्ट फेस्टिव्हल सुरु झाले आहे. हे 21 दिवस म्हणजेच 26 ऑगस्टपर्यंत चालेल. यावेळी यामध्ये जगभरातील 55 हजार आर्टिस्ट भाग घेत आहेत. येथे त्यांच्या परफॉर्मन्ससाठी 317 व्हेन्यू बनवले गेले आहेत. जेथे 4000 शो आयोजित होतील. 


या फेस्टिव्हलचे वैशिष्ठ्य हे आहे की, येथे कुणीही आर्टिस्ट येऊन आपली कला सादर करू शकते. फेस्टिव्हलचे मंच सर्वांसाठी खुले आहेत. या कारणाने याला कला आणि मनोरंजनाचा सर्वात प्रसिद्ध उत्सवदेखील म्हणले जाते. 


फेस्टिवलमध्ये कॉमेडी, थियेटर, पथनाट्य, डान्स, सर्कस, कॅबरे, लहान मुलांचे संगीत, पेंटिंग, फोटोग्राफी, एग्जीबिशन आणि ओपेरा यांसह अनेक कार्यक्रम होतात. यामध्ये सामील होण्यासाठी जगभरातून प्रसिद्ध आर्टिस्टदेखील येथे येतात. 

72 वर्षांपूर्वी सुरु झाले होते फेस्टिव्हल  
आर्ट फेस्टिव्हल 72 वर्षांपूर्वी 1947 मध्ये पहिल्यांदा सुरु झाले. हे खुल्या मंचावर लोकांसमोर सादर केले गेले होते. जेणेकरून लोकांनी समोर यावे आणि आपल्या कलेचे सादरीकरण करावे. 

बातम्या आणखी आहेत...