आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेन्मेंट डेस्क : अमिताभ बच्चन यांच्याकडे सातत्याने चांगले चित्रपट येत आहेत. त्यातील बहुतांश मोठ्या बॅनरचे प्रोजेक्ट आहेत. या प्रोजक्ट्सशी संबंधित उच्च पदस्थ लोकांकडून माहिती घेतली असता नुकतीच यशराज बॅनरचा प्रमुख आदित्य चोप्रा आणि अमिताभ बच्चन यांच्यात एक खास बैठक झाल्याचे कळले. ही बैठक 'गुलाबो सिताबो'च्या शूटिंगबाबत लखनऊला जाण्यापूर्वी झाली. ही बैठक यशराज बॅनरसोबतचा 'धूम ४' किंवा 'पृथ्वीराज चौहान'साठी झाली आहे.
- 05 चित्रपट अमिताभ आणि आदित्य सोबत
- 06 मोठ्या चित्रपटांत दिसतील पुढच्या वर्षी
- 02 चित्रपट'फायटर्स' व 'शमशेरा' करत आहेत आदित्य चोप्रा
आदित्य करू इच्छितो दमदार पुनरागमन...
गेल्या वर्षी यशराज बॅनरचा मोठा चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'च्या अपयशानंतर आदित्य चोप्रा दमदार पुनरागमन करू इच्छित आहे. त्यामुळे आदित्य मेगाबजेट प्रोजेक्ट्सच्या कथेपासून ते कलावंत आणि दिग्दर्शकांच्या निवडीबाबत काळजी घेत आहे. ज्यांचे भरपूर चाहते आहेत आणि ज्यांचे चित्रपट हिट होण्याची खात्री आहे, अशांचीच तो निवड करणार आहे.
पुन्हा दिसेल अक्षय-अमिताभ यांची जोडी...
'पृथ्वीराज चौहान'बाबत बोलायचे झाल्यास अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर यांची निवड पक्की झाली आहे. हा इतिहासावर आधारित युद्धपट आहे. पावसाळ्यानंतर या चित्रपटाच्या शूटिंगला सप्टेंबरपासून सुरुवात होईल. सूत्रांचे म्हणणे आहे की, आदित्य चोप्रासोबत यासंदर्भातही बैठकीत चर्चा झाली आहे.
बाप-लेक एकत्र येतील...
'धूम ४' बाबत गेल्या वर्षीपासून चर्चा सुरू आहे. यासाठी आमिर, सलमान आणि शाहरुख खान यांची नावे समोर आली. तथापि, खलनायक कोण असेल, हे अद्याप निश्चित झाले नाही. अमिताभ यांनी जर या चित्रपटासाठी होकार दिला तर ते आणि अभिषेक 'पा' चित्रपटाच्या दहा वर्षांनंतर पुन्हा एकत्र येतील.
अमिताभ आणि यशराज बॅनर यांचे नाते जुनेच...
अमिताभ हे यशराज फिल्म्ससोबत अनेक वर्षांपासून जोडलेले आहेत. त्यांनी अदित्य चोप्राचे वडील यश राज चोप्रा यांच्यासोबतही अनेक चित्रपट केले आहेत. त्यामध्ये दीवार (१९७५), कभी-कभी (१९७६), त्रिशूल (१९७८), काला पत्थर (१९७९) आणि सिलसिला (१९८१) यांचा समावेश आहे. त्यामुळे या बॅनरसोबत अमिताभ यांचे जुने नाते आहे. या बॅनरसोबचे त्यांचे बहुतांश चित्रपट हिट ठरले.
आदित्य चोप्रासोबतचे अमिताभ यांचे चित्रपट...
मोहब्बतें (2000)
वीर-जारा (2004)
बंटी और बबली (2005)
झूम बराबर झूम(2007)
ठग्स ऑफ हिंदोस्तान (2018)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.