आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Big B Get In Trouble Due To Tweeting About The New Year, Anurag Kashyap Said, 'The Difference Is Not 19 20, It Is Huge'

नव्या वर्षाबद्दल ट्वीट करून फसले बिग बी, अनुराग कश्यप म्हणाला, 'फरक 19-20 चा नाही, फरक खूप मोठा आहे'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : नागरिकता संशोधन बिलबद्दल गप्प राहिल्यामुळे खूप निंदा झेलल्यानंतर अमिताभ बच्चन सोशल मीडियावर पुन्हा सक्रिय झाले आहेत. अशातच बिग बींनी नव्या वर्षाबद्दल एक ट्वीट केले आहे. या ट्विटमध्ये बिग बींनी लिहिले, ''नवे वर्षे येण्यात काही दिवसाचं बाकी आहेत, जास्त त्रस्त होऊ नका, केवळ.... 19-20 (एकोणीस वीस) चाच फरक आहे. बिग बींच्या या ट्वीटवर फिल्ममेकर अनुराग कश्यपने प्रतिक्रिया देत एक ट्वीट केले आहे आणि त्यांच्यावर निशाणा साधला आहेत''

अनुरागने बिग बींना दिले उत्तर... 


अनुरागने ट्विटरवर या ट्वीटला रिप्लाय करून लिहिले, “यावेळी फरक एकोणीस वीसचा नाहीये सर, यावेळी फरक खूप मोठा आहे, सध्या तुम्ही कृपया आपल्या तब्येतीची काळजी घ्या. तुमच्या वाट्याचे तुम्ही 70 च्या दशकातच केले आहे, तेव्हापासून आमच्यातील बच्चन आम्ही आमच्या आत घेऊन फिरत आहोत. यावेळी समोर गब्बर असो किंवा LION किंवा मग शाकाल.... आम्हीही पाहू."

अक्षय कुमारचाही घेतला होता क्लास... 


काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारकडून नागरिकता संशोधन अधिनियम (सीएए) च्या विरुद्ध सुरु असलेल्या प्रोटेस्टशी निगडित एक ट्वीट चुकून लाइक झाले होते. या ट्वीटसोबत एक व्हिडिओ होता, ज्यामध्ये दिल्लीच्या जामिया मिलिया विश्वविद्यालयतील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईची चेष्टा केली गेली, नंतर अक्षयने याला अनलाइक केले होते. पण तो ट्विटर यूजर्सच्या निशाण्यावर आला होता. एका यूजरने अक्षयला पाठीचा कान नसलेला व्यक्ती म्हणाले आहे. ज्याचे समर्थन डायरेक्टर अनुराग कश्यपने केले होते. ट्विटर यूजरने अक्षयवर निशाणा साधत लिहिले होते, "मी अक्षय कुमारचा खूप आदर करतो. पाठीच्या कण्याविना मार्शल आर्टची ट्रेनिंग घेताना खूप त्रास झाला असेल." ट्विटर यूजरला सपोर्ट करत अनुरागने लिहिले, "अगदी बरोबर.."

बातम्या आणखी आहेत...