आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिग बी-जया बच्चनच्या लग्नात होते केवळ पाच व-हाडी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी 11 ऑक्टोबर रोजी वयाची 77 वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल लाइफविषयी त्यांच्या चाहत्यांना बरंच काही ठाऊक आहे. मात्र त्यांचे लग्न नेमक्या कोणत्या परिस्थितीत झाले होते, याविषयी फारसे कुणाला काही ठाऊक नाही. अगदी दोन दिवसांत बिग बी आणि जया यांचे लग्न ठरले होते. लग्नात बिग बींकडून वरातीत केवळ पाच लोक सहभागी झाले होते. 'जंजीर' हा चित्रपट हिट झाल्यानंतर बिग बींना जयासोबत परदेशात फिरायला जायचे होते. पण हरिवंशराय बच्चन यांनी सांगितले, की परदेशात जायचे तर आधी लग्न करा. जून 1973 ची ही घटना. त्यावेळी अमिताभ तीस वर्षांचा होते. अखेर दोन दिवसांची नोटीस देऊन लग्न उरकरण्यात आले. लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी अमिताभ तीन आठवड्यांसाठी लंडनला गेले. अगदी साध्या समारंभात अमिताभ आणि जया लग्नगाठीत अडकले. 

लग्नात केवळ पाच व-हाडी...
अमिताभ बच्चन यांच्या वरातीत वडिलांसह केवळ पाच लोक सहभागी झाले होते. यामध्ये फिल्म इंडस्ट्रीतून केवळ गुलजार साहेब होते. तर वधू जयाच्या बाजुने आईवडील आणि बहिणीसोबत अभिनेते असरानी आणि अभिनेत्री फरीदा जलाल सहभागी झाल्या होत्या. लग्नानंतर आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीला आमंत्रित करण्यात आले होते.