आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Big Bang For NCP In Beed, Cage's First Candidate Erupts; Namita Munda Will Enter BJP

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, केजच्या उमेदवार नमिता मुंदडांचा भाजपमध्ये प्रवेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आपल्या उमेदवारांची पहिली यादी देखील जाहीर केली होती. मात्र पवारांनी जाहीर केलेला बीड जिल्ह्यातील केजचा उमेदवार फुटला आहे. नमिता मुंदडा यांनी पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. 

नमिता मुंदडा यांनी काही दिवसांपूर्वी एक फेसबुक पोस्ट टाकली होती. नमिता मुंदडांच्या फेसबुक पोस्टमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह तसेच अध्यक्ष शरद पवारांचा फोटो देखील नव्हता. या फेसबुक पोस्ट नंतरच त्यांच्या पक्षबदलाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

शरद पवार यांनी बीड दौऱ्यात जिल्ह्यातील 5 उमेदवार जाहीर केले होते. त्यामध्ये नमिता मुंदडा यांचे नाव होते. मात्र पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीवर टीका करताना उमेदवार फुटण्याच्या भीतीने राष्ट्रवादीने बीडमधील उमेदवार जाहीर केल्याचा आरोप केला होता.