आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धार्थच नव्हे, तर या अभिनेत्यांनाही जावे लागले होते पुनर्वसन केंद्रामध्ये..

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिग बॉसच्या १३ व्या सीझनचा स्पर्धक पारस छाबराने घरातील सदस्य सिद्धार्थ शुक्लाबाबत एक खुलासा केला आहे. एका टास्कच्या वेळी पारस आणि सिद्धार्थ यांच्यात खूप वाद झाला. सिद्धार्थ आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकला नाही. यानंतर पारसने घरातील इतर सदस्यांना सांगितले की, सिद्धार्थ आपल्या रागावर नियंत्रण मिळवू शकत नाही. यामुळेच त्याला पुनर्वसन केंद्रामध्ये एक वर्ष उपचार घ्यावा लागला होता. ही गोष्ट पारसला सिद्धार्थच्या ड्रायव्हरने सांगितली होती. जाणून घेऊया कोणकोणत्या कलाकारांना पुनर्वसन केंद्रामध्ये जावे लागले होते....

  • सौरभ पांडे

श्रीकृष्णाचे पात्र साकारणाऱ्या सौरभ पांडेला ड्रग्सचे व्यसन लागले होते. सौरभने सांगितले, "आपण आपल्या मनाचे ऐकले तर योग्य मार्ग सापडेल. मी हेच केले आणि पुनर्वसन केंद्रात अनेक दिवस ध्यानधारणा केली. ड्रग्जमुळे मी आपल्या आयुष्याचे नुकसान करून घेणार नाही, असे त्या वेळी ठरवले  होते. 

  • सिद्धार्थ सागर

सिद्धार्थने सांगितले, तणावाच्या काळात मी नशा करत होतो. यातून बाहेर निघण्यासाठी एखाद्या पुनर्वसनन केंद्रात दाखल करण्यास आईला सांगितले. तेथील अनुभव वेदनादायी होते. लोक मला मारायचे. काही महिन्यानंतर आपल्या मॅनेजरच्या मदतीने यातून बाहेर आलो.

  • कपिल शर्मा

२०१८ मध्ये कपिल शर्मा संकटांचा सामना करत होता. याचा परिणाम त्याच्या खासगी आयुष्यावर झाला आणि मानसिक स्थितीही ढासळली. दारूचे व्यसन जडले. ते सोडवण्यासाठी कपिलने मुंबईबाहेरील एका पुनर्वसन केंद्रामध्ये त्याने उपचार घेतले. त्यानंतर तो परत काम करायला लागला. 

  • श्वेता बासू प्रसाद

‘मकडी’ फेम आणि २०१४ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेती श्वेता बासू प्रसादला एका आरोपाखाली अटक केली होती. त्यानंतर ती खूप तणावाखाली राहत होती. पोलिसांनी तिला ६ महिने पुनर्वसन केंद्रात पाठवले होते.

बातम्या आणखी आहेत...