आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बिग बॉस मराठी सिझन २' किशोरी, वीणा आणि रुपालीमध्ये पडणार का फूट ?, रुपाली म्हणाली - 'वीणा तुझ्या वागण्याने आम्ही खूप हर्ट झालो'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या सिझन मध्ये पहिला जो ग्रुप तयार झाला तो होता KVR - किशोरी, रुपाली आणि वीणा. हा ग्रुप प्रेक्षक आणि घरातील सदस्य यांमध्ये बराच चर्चेत आहे. त्यांची मैत्री आणि एकमेकांबद्दलच प्रेम आपण सगळ्यानी पाहिलं आहे. पण आता यांच्यामध्ये खटके उडायला सुरुवात झाली आहे. परागच्या अचानक घराबाहेर पडण्याने सगळेच बदलले आहे. या तिघी एकत्र आल्या, तरी देखील किशोरी आणि रुपालीला वीणाचे वागणे खटकत आहे. ग्रुपला ती हवा तेवढा वेळ देत नाही आणि संपूर्ण वेळ शिवबरोबर घालवते असे त्यांचे म्हणणे आहे. 

 

इतर सदस्यांसोबत बोलण्यात काहीच वावगं नाही पण किमान एक तास तरी आपल्या ग्रुपला म्हणजेच किशोरी आणि रुपाली यांना द्यावा जेणेकरून स्ट्रॅटरजी आखता येईल असे त्यांचे म्हणणे आहे, जे त्यांनी पराग असतानाच ठरवले होते. कारण, शिव बरोबर वेळात वेळ काढतो आणि टीमला वेळ देतो असे देखील त्यांनी वीणाला सांगितले. कालच्या वादानंतर आज देखील वीणा, रुपाली आणि किशोरीमध्ये वाद होणार आहे. वीणाचे म्हणणे आहे की, सकाळपासून मला बरे वाटत नाहीये पण कुणीच मला विचारायला आले नाही, रुपाली माझ्याकडे आली देखील नाही. किशोरी यांनी वीणाला समजविण्याचा प्रयत्न केला की, काल रात्री ठरले होते की, आपण बोलायचे, रुपाली यावर वीणाला म्हणाली, "वीणा तुझ्या वागण्याने आम्ही खूप हर्ट झालो आहे" यावर वीणाने त्यांना सांगितले 'मग तुम्ही टीम म्हणून खेळा मी एकटी खेळणार.'

 

काल काय घडले ?
मुद्द्याची सुरुवात काल पार पडलेल्या नॉमिनेशन टास्कमुळे झाली. वीणाकडे ग्रुपमध्ये बसून चर्चा करण्यास वेळ नाही अशी तक्रार त्यांनी तिच्याकडे केली. काल नॉमिनेशन प्रक्रिया पार पडल्यानंतर वीणाने असे म्हंटले की, 'हल्ली आपण गेमबाबत काही ठरवत का नाही ?' यावर वीणाने तिचे मुद्दे मांडले, परंतु रुपाली तिच्यावर चिडली आणि म्हणली, 'तुला आजकल इतरांशी गप्पा मारण्यामधून वेळ मिळत नाही, आणि या चर्चेचा त्रास होतो म्हणून हा विषय काढला नाही. तुझ्या कलेने आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो आहे, आम्ही असे ठरवले होते की, तू हा विषय काढलास की, बोलायचे.' त्यामुळे आजच्या भागातच कळेल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज काय घडणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...