मराठी बिग-बॉस / Big Boss Marathi: शिव ठाकरे बनला 'मराठी बिग-बॉस 2' चा विजेता

महेश मांजकेकरांनी शिव ठाकरेला दिली चित्रपटात काम करण्याची संधी 
 

दिव्य मराठी वेब

Sep 17,2019 01:12:13 PM IST

मुंबई - मराठी बिग बॉस-२ च्या महाअंतिम सोहळ्यात अमरावतीच्या शिव मनोहर ठाकरे याने बाजी मारली. शिव आणि नेहा शितोळे हे दोघे बिग बॉसच्या अंतिम फेरीत होते. अंतिम फेरी सुरू असताना किशोरी शहाणे, शिवानी सुर्वे, वीणा जगताप व आरोह वेलणकर हे चौघे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले. त्यानंतर शिव आणि नेहा या दोघांपैकी कोण जिंकणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष होते. महेश मांजरेकर यांनी शिव विजयी ठरल्याची घोषणा करताना आपल्या आगमी चित्रपटात त्याला घेणार असल्याचे जाहीर केले.


शिवच्या घरची परिस्थिती जेमतेम असून, त्याचे वडील मनोहर ठाकरे हे पानठेला व किराणा दुकान चालवतात. तसेच आई गृहिणी असून त्या महिला सक्षमीकरणाचे काम करतात. शिवने अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे.

परमेश्वराची साथ म्हणून...
प्रेक्षकांनी दिलेले अफाट प्रेम, परमेश्वराची साथ आणि शिवची जिद्द यामुळेच त्याला यश मिळाले. तो जिंकणार याची मला पूर्ण खात्री हाेती. - आशाबाई, आई

तो जिंकणार याची खात्री होतीच
शिव जिंकणार याची खात्री होतीच. प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळेच तो यशोशिखर गाठू शकला. आज आनंद गगनात मावेनासा झालाय.
-मनोहर ठाकरे, वडील.

X
COMMENT