Big Boss / Big Boss Marathi : शिवानी सुर्वेला मिळाले ‘टिकेट टू फिनाले’

 प्रकृतीच्या कारणास्तव बाहेर पडलेल्या शिवानीने खेळात परतल्यावर बिग बॉसच्या इतर स्पर्धकांसोबतच प्रेक्षकांचीही मने जिंकली

Aug 23,2019 11:50:00 AM IST

टीव्ही डेस्क - अभिनेत्री शिवानी सुर्वे बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातली सर्वाधिक स्ट्राँग स्पर्धक आहे. बिग बॉसच्या घरात आलेल्या नऊपैकी पाच स्पर्धकांनी शिवानी सुर्वेला ‘टिकेट टू फिनाले’ दिले आहे. बाप्पा जोशी, दिगंबर नाईक, सुरेखा पुणेकर, रूपाली भोसले, माधव देवचके ह्या पाच स्पर्धकांना शिवानी सुर्वे स्ट्राँग स्पर्धक वाटत असल्याचे दिसून आले. दिगंबर नाईक यांनी शिवानीला टिकेट टू फिनाले देताना म्हटले, “बिग बॉसच्या घरात शेवटपर्यंत जाण्यासाठी जसे खेळायला हवे. तसेच शिवानी तू खेळत आहेस. तू एक स्ट्राँग कंटेस्टंट आहेस. तू खूप छान खेळत आहेस.”


सगळे एक्स-कंटेस्टंट परतल्यावर शिवानीसोबतची त्यांची बाँडिंगही स्पष्ट दिसून येत होती. सूत्रांच्या अनुसार, बिग बॉसमधून प्रकृतीच्या कारणास्तव बाहेर पडलेल्या शिवानीने पूर्ण बरे होऊन या खेळात परतल्यावर बिग बॉसच्या इतर स्पर्धकांसोबतच प्रेक्षकांचीही मने जिंकली. शिवानीमध्ये दर दिवशी दिसलेला सकारात्मक बदल, तिचे या खेळाला घेऊन दिसत असलेले गांभीर्य, सर्व स्पर्धकांसोबत मिळून-मिसळून वागणे, टास्कमधला सक्रिय सहभाग अशा अनेक जमेच्या बाबी आहेत.

X