आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानच्या व्यस्त शेड्युलमुळे पुढे ढकलणार नाही बिग बॉस, पुढच्या महिन्यात होईल फिनाले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस 13' आपल्या घरातील वादामुळे नेहमी चर्चेत राहतो. हा शाे आणखी काही दिवस वाढवण्यात येणार असल्याची चर्चा होती. लोकप्रियतेच्या कारणांमुळे निर्माते हा शो काही दिवस पुढे ढकलणार होते. मात्र सूत्रानुसार, हा शो एक्सटेंड होणार नाही तर पुढच्या महिन्यात याचा फिनाले ठरवण्यात आला आहे.

शोच्या जवळच्या सूत्रानुसार... 

हा शो पुढे ढकलण्याची निर्मात्यांची इच्छा होती. कारण हा शो लोकप्रिय आहे, शिवाय गेल्या काही आठवड्यापेक्षा या आठवड्यात शोला चांगली रेटिंग्ज मिळाली होती. सर्व प्लॅन आणि या शोचा सर्वात महत्त्वाचा भाग सलमान खान आहे, ताे याचे सूत्रसंचालन करतो, निर्माते त्याच्याशिवाय हा शो एक्सटेंड करू इच्छित नाहीत. सलमान सध्या आपला चित्रपट कभी ईद कभी दिवाली'च्या प्री-प्रॉडक्शनमध्ये व्यग्र आहे. त्यामुळे तो या शोचे सूत्रसंचालन करू शकणार नाही. त्यामुळे १५ फेब्रुवारीला याचा फिनाले ठेवण्यात आला आहे.