आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडनीमध्ये भीषण दुष्काळ, नळ सुरू ठेवल्यावर होईल गुन्हा, पाण्याच्या नासाडीवर बसणार 26 हजारांचा दंड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी- ऑस्ट्रेलियामध्ये डिसेंबर आणि फेब्रुवारी दरम्यान गरमीमुळे नद्यांच्या पाण्याची पातळी तीव्रतेने कमी होत आहे. त्यामुळे सिडनीमध्ये गंभीर समस्या निर्माण झाली आहे. 1940 नंतर जलसाठे पुन्हा एकदा आपल्या किमान पातळीपर्यंत पोहचले आहेत. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी न्यू साउथ वेल्स प्रशासनाने पुन्हा एकदा कठोर पाउले उचलले आहेत.


नळ सुरू ठेवल्यावर भरावा लागेल दंड
प्रशासनाच्या नियमानुसार, पाण्याचा नळ सुरू ठेऊन पाणी वाया घातल्यावर गुन्हा नोंद करण्यात येईल. याव्यतिरिक्त जर एखाद्याने आपल्या बगीच्यामध्ये पाणी टाकण्यासाठी स्प्रिंकलरचा वापर केला तर त्यालाही दंड भरावा लागेल. तसेच, पाण्याचा गैरवापर केल्यावर 10 हजार 613 रुपये आणि संस्थेवर 26 हजार 532 रुपयांचा दंड आकारण्यात येईल. हे सर्व नियम पुढील आठवड्यापासून नियमित लागू करण्यात येतील.

 

2009 मध्येही लागू केले गेले होते नियम
यापूर्वी पाण्याची नासाडी थांबवण्यासाठी न्यू साउथ वेल्स प्रशासनाने 2009 मध्ये काही प्रतिबंध लावले होते. त्याकाळात पाण्याचा गैरवापर केल्यावर लोकांना भुर्दंड लावण्याची शासनाने तरतूद केली होती. तसेच, सिडनीच्या काही भागात आजही हे नियम लागू आहे.
 

प्रत्येकाची पाणी वाचवण्याची जबाबदारी
काही महिन्यांपूर्वी सिडनीच्या मरे-डार्लिंग नदीमध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक मासे मरण पावले होते. त्यामुळे निवडणूकीत या मुद्द्याला चांगलेच उचलून धरण्यात आले. तज्ञांच्या मते, नदीमध्ये पाण्याचा प्रवाह कमी झाल्यावर ऑक्सीजनचे प्रमाणही घटते. त्यामुळे माशांना श्वास घेताना त्रास झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. दक्षिण-पुर्वेकडील राज्याचे जल मंत्री मेलिंडा पवे यांनी सांगितले की, संपूर्ण क्षेत्राला दुष्काळाचा खूप मोठा फटका बसला आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वांना एकत्र येऊन काम करावे लागेल.