आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशातील 2019 वर्षातील मोठ्या घटना...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वजिरालाँगकॉर्न यांच्याकडे रांगत गेली सुथिदा. याची खूप चर्चा झाली. - Divya Marathi
वजिरालाँगकॉर्न यांच्याकडे रांगत गेली सुथिदा. याची खूप चर्चा झाली.

संमेलन : जी-20 मध्ये मोदींचा JAI मंत्र, जी 7 चे सदस्य नसतानाही निमंत्रण... 

  • जूनमध्ये आेसाकामध्ये जी-२० संमेलनात मोदींनी सांगितले की, जपान, अमेरिका आणि इंडिया यांचा अर्थ आहे जय (JAI). या तिघांच्या मैत्रीने शत्रूंची झोप उडवली आहे. हे तिघे लोकशाहीसाठी समर्पित आहेत.
  • २४-२६ ऑगस्ट दरम्यान फ्रान्समध्ये जी-७ देशांच्या संमेलनाचे मोदींना निमंत्रण. भारत सदस्य नसतांनाही निमंत्रण मिळणे मोठी गोष्ट.
  • नोव्हेंबरमध्ये बँकॉकमध्ये झालेल्या आसियान संमेलनात मोदींनी सांगितले, भारत समुद्रासह इतर क्षेत्रात अासियानसोबत सहकार्य वाढवण्यास तयार आहे. विकासासाठी आसियान आणि भारतामध्ये संपर्क आवश्यक आहे.
  • ब्राझिलमध्ये नोव्हेंबरमध्ये झालेल्या ब्रिक्स संमेलनात मोदींनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सांगितले, यामुळे जगाचे ७१ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

करार : गुरू पर्वावर कर्तारपूर कॉरिडॉर खुले, विनाव्हिसा गुरुद्वारात दर्शन... 

  • भारत आणि पाकिस्तानदरम्यान कर्तारपूर काॅरिडॉर ९ नोव्हेंबरला सुरू झाला. भारतातून रोज ५ हजार शीख भाविक कर्तारपूर साहेब जाऊ शकतील. यासाठी त्यांना केवळ पासपोर्ट बाळगावा लागेल. व्हिसाची गरज नाही.
  • यंदा सप्टेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियात गेले. दोन्ही देशांनी संरक्षण, अंतराळसह १३ मोठ्या करार केले. भारतीय अंतराळवीर रशियामध्ये मानवी अंतराळ उड्डाणांसाठी प्रशिक्षण घेतील.

रंजक : जपानमध्ये १२६ व्या राजाला गादी मिळाली, थायलंडमध्ये राजाला राणी... 

  • थायलंडचे राजा वजिरालाँगकॉर्न यांना नवी राणी मिळाली. ६६ वर्षांच्या राजांनी २६ वर्षे लहान अंगरक्षकाशी लग्न केले. राणी रांगत राजाजवळ गेली.
  • मेमध्ये २६०० वर्षांपासून जपानवर राज्य करणाऱ्या राजघराण्याच्या १२६ व्या राजाला गादी मिळाली. २०० वर्षांच्या इतिहासात प्रथमच राजाने पद सोडले.
  • ३ मे रोजी कॅनडाचा १० डॉलर झाला 'बेस्ट नोट ऑफ द इयर'. ही जगातील पहिली व्हर्टिकल नोट आहे.
बातम्या आणखी आहेत...