Home | Maharashtra | Pune | big fake stamp papers scam exposed in pune

पुण्यात 86 लाख 38 हजारांचे बनावट स्टॅम्प पेपर जप्त; आई-वडील आणि मुलगा चालवायचे धंदा, मोठ्या रॅकेटच्या हात असल्याचा पोलिसांना संशय

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 20, 2019, 01:22 PM IST

2007 मध्ये अशाचप्रकारे तेलगीला कोट्यावधी रूपयांच्या बनावट स्टॅम्प प्रकरणी अटक झाली होती

 • big fake stamp papers scam exposed in pune

  पुणे- पुण्यात बनवाट स्टॅम्प बनवण्याचे प्रकरण समोर आले आहे. तब्बल 86 लाख 38 हजारांचे बनावट स्टॅम्प पेपर जप्त करण्यात आले आहेत. यात बनावट सही-शिक्क्यांचा वापर करत स्टॅम्प पेपरची विक्री करण्यात आली. या प्रकरणी एकाच कुटुंबातील तिघांना पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी अटक केली असून, तिघांनाही पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.


  पुणे शहरात देशपांडे स्टॅम्प व्हेंडर नावाचे दुकान आहे. या दुकानातूनच देशपांडे कुटुंब बनावट स्टॅम्प बनवत होते. पुणे शहरात दोन ठिकाणी देशपांडे स्टॅम्प व्हेंडर स्टॅम्पची विक्री करत होते. 100 आणि 500 रुपयांचे सुमारे 86 लाख 38 हजार रुपयांचे स्टॅम्प त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहेत. हे बनावट स्टॅम्प पोत्यांमध्ये बांधून ठेवण्यात आले होते.


  देशपांडे स्टॅम्प व्हेंडरचे मालक असलेल्या आई-वडिलांसह मुलाला आता विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, स्टॅम्पचा तुटवडा असतानाही मोठ्या प्रमाणात देशपांडे स्टॅम्प व्हेंडरकडे स्टॅम्प आले कुठून, याची चौकशी आता पोलिसांनी सुरू केली असून, राज्यातील मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.


  अशाच प्रकारचा स्टॅम्प पेपर घोटाळ याआधी झाला होता
  अब्दुल करीम तेलगी याला कोट्यवधी रुपयांच्या बनावट मुद्रांक घोटाळा प्रकरणी 2007 मध्ये दोषी ठरविण्यात आले होते. त्याला 30 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती तसेच 202 कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. 2007 मध्ये उघडकीस आलेल्या मुद्रांक घोटाळ्याने आणि तेलगीने आपल्या कबुलीजबाबात छगन भुजबळ यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक मोठ्या नेत्यांची नावे घेतल्याने तेव्हा हा गैरव्यवहार माध्यमांत चांगलाच गाजला होता. या प्रकरणी सात जून 2003 रोजी पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात भिवंडीतून 2200 कोटी, तर मुंबईतील कफ परेड भागातून 800 कोटी रुपयांचे बनावट मुद्रांक जप्त करण्यात आले होते. बनावट मुद्रांक घोटाळ्याची व्याप्ती एवढी होती, की त्यानंतर तेलगीवर देशभरात 39 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते.

Trending