maharashtra rain / गडचिरोलीत महापूराने थैमान, जिल्हातील अनेक गांवाचा तीन दिवसांपासून संपर्क तुटला

पुरामुळे जिल्ह्यातील 16 रस्ते बंद झाली आहेत

Sep 06,2019 10:26:16 PM IST

गडचिरोली- नुकतच महाराष्ट्राने सांगली आणि कोल्हापूरमध्ये पुराचा हाहा:कार पाहीला. त्या ठिकाणचा पूर आता हळु-हळू ओसरू लागला आहे. पण आता गडचिरोलीमध्ये पुराने थैमान घातल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. राज्यातील आदिवासी जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोलीतील अनेक गावं गेल्या काही दिवसांपासून संपर्काच्या बाहेर आहेत, तर अनेक ठिकाणी रस्ते आणि पूलही वाहून गेले आहेत. आरमोरी, कुरखेडा, चार्मोशी, अहेरी, भामरागड, सिरोंचा, एटापल्ली, मुलचेरा, देसाईगंज या तालुक्यात तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे.

देसाईगंज तालुक्यात तीन तासात विक्रमी 215.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. भामरागड तालुक्यातील 100 पेक्षा अधिक गावांचा तीन दिवसापासून संपर्क तुटलेला आहे. काही भागात 8 सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली.


भामरागड तालुक्यातील पर्लाकोटा आणि बंढीया पुलावरून पाणी वाहत असलयाने आलापल्ली-भामरागड मार्ग तीन दिवसापासून बंद आहे. वाहतूक पूर्णपणे ठप्प असून भामरागड गावात पुराचे पाणी शिरल्याने 25 घरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. पर्लकोटा, वैनगंगा, दिना, प्राणहिता, इंद्रवती, गोदावरी, इराई, साप या आठ नद्यांना महापूर आलाय. दरम्यान, प्रशासनाचे युद्ध पातळीवर काम सुरू आहे.

X