Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | Big loss Furniture Mall in Fire at Parbhani

परभणीत तीन मजली फर्निचर शोरूम आगीत भस्मसात, कोट्यावधीचे नुकसान, मोठा अनर्थ टळला

प्रतिनिधी | Update - Mar 16, 2019, 05:48 PM IST

पाहता-पाहता संपूर्ण इमारतच आगीच्या विळख्यात सापडली.

  • Big loss Furniture Mall in Fire  at Parbhani

    परभणी- शहरातील जिंतूर रस्त्यावरील द वुड्स हे फर्निचरचे तीन मजली दालन शनिवारी (दि.16) लागलेल्या भीषण आगीत भस्मसात झाले. आगीच्या रौद्ररूपाने तांडव घातल्यानंतर आजूबाजूच्या इमारतीही कवेत घेण्याचा प्रयत्न केला. जवळपास दहा ते बारा अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या आगीत कोट्यावधी रुपयांच्या फर्निचरचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

    व्यापारी दिनेश लड्डा व संतोष लड्डा यांचे जिंतूर रस्त्यावर द वुड्स व श्री फर्निचर हे घऱगुती फर्निचरचे तीन मजली भव्य असे दालन आहे. शहरातील सर्वात मोठे अत्याधुनिक दालन असाही त्याचा उल्लेख होतो. शनिवारी नेहमी प्रमाणे व्यवहार सुरू असताना वरच्या तिसर्‍या मजल्यावरून धूर येत असल्याचे लक्षात आले. परंतु काही वेळातच संपूर्ण मजल्यावरही लाकडी फर्निचरने पेट घेतला.


    खिडक्यामधून दुसर्‍या मजल्यावरही आग पसरली. पाहता-पाहता संपूर्ण इमारतच आगीच्या विळख्यात सापडली. आगीचा लोळ वाढण्यापूर्वीच कर्मचार्‍यांनी ती विझविण्यासाठी बाहेर धाव घेतली. परंतु मोठी असल्याने तातडीने अग्नीशमन दलाचे दलाचे बंब पाचारण करण्यात आले. परंतु फर्निचरमध्ये सोफा, कुशन, दिवाण, बेड, डायनिंग टेबल, झुले यासारखे लाकडी व ज्वलनशील प्लॉस्टिकच्या वस्तुचा मोठया प्रमाणात समावेश असल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले.

    शहरात दूरवर आगीचे लोळ दिसत होते. ही बाब लक्षात घेवून काही नागरिकांसह स्वयंसेवी संस्थाच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली. अग्निशमनदलासह रुग्णवाहिका देखील घटनास्थळी दाखल झाले. मोठा पोलिस बंदोबस्त तैनात झाला.

Trending