आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवनिर्वाचीत शिक्षणमंत्र्यांच्या पहिल्याच सार्वजनिक कार्यक्रमात गोंधळ, भेटण्यास वेळ न दिल्याने पालकांनी घातला गोंधळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्रीपदी विराजमान झाल्यावर आशिष शेलारांच्या पुण्यातील पहिल्याच सार्वजनिक कार्यक्रमात गोंधळ झाल्याचा प्रकार घडला आहे. आठवीपर्यंत मुलांना नापास न करण्याचा कायदा असतानाही पुण्यातील एका शाळेने मुलांना नापास केले. याच मुद्द्यावर शेलारांना बोलण्याची मागणी पालकांनी केली. पण, शेलार पालकांना वेळ न देताच कार्यक्रमातून निघून गेल्याने संतप्त पालकांनी गोंधळ घातला.


पालक म्हणाले, ''संबंधित शाळेने आमच्या 6 वी आणि 7 वीच्या मुलांना नापास केले. या शाळा मनमानी करत आहेत, आम्ही यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो, पण शिक्षणमंत्र्यांनी वेळ न देता निघून गेले." यावेळी शेलार यांना अकरावी प्रवेशातील गोंधळाबाबतही विचारणा करण्यात आली, मात्र त्यांनी यावर काहीच प्रतिक्रीया दिली नाही.

 

याआधी तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी मध्यस्थी केली होती. पण, शाळेने विद्यार्थ्यांना पुन्हा काढून टाकले, असाही आरोप संबंधित पालकांनी केला आहे. आशिष शेलार पुण्यातील हेल्दी ग्लोब स्मार्ट व्हर्च्युअल एज्युकेशनच्यावतीने 'पढेगा भारत' या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते.