आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Big Points ... Hong Kong People On The Streets For 7 Months To Crush China's Ego

मोठे मुद्दे... चीनचा अहंकार चिरडून लोकशाहीसाठी हाँगकाँगचे लोक 7 महिन्यांपासून रस्त्यांवर

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
हाँगकाँगमध्ये लोकशाही समर्थनार्थ ७ महिन्यांपासून निदर्शने सुरू आहेत - Divya Marathi
हाँगकाँगमध्ये लोकशाही समर्थनार्थ ७ महिन्यांपासून निदर्शने सुरू आहेत

चीनने लष्कर उतरवले


हाँगकाँगमध्ये लोकशाही समर्थनार्थ ७ महिन्यांपासून निदर्शने सुरू आहेत. ८ डिसेंबरला ८ लाखांपेक्षा जास्त लोकांनी रॅली काढली.चीन त्यांचे स्वातंत्र्य नष्ट करत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. चीनने विरोध मोडून काढण्यासाठी लष्कराला उतरवले.

गो ग्रीन : १३९ देशांतील मुले नेत्यांना म्हणाली- आमचे बालपण हिरावू नका

  • सप्टेंबरमध्ये हवामान बदलावर मोठे देश अपयशी ठरल्याने लोकांचा संताप वाढला. याचा नवा चेहरा झाली केवळ १६ वर्षांची ग्रेटा थनबर्ग. ग्रेटाने याविरोधात मोहीम राबवली. तिच्या समर्थनार्थ जगातील १३९ देशांमध्ये ५० लाखांपेक्षा जास्त मुले आणि युवक रस्त्यांवर उतरले. या वर्षी जगात पर्यावरण संरक्षणासाठी १०० पेक्षा मोठे आंदोलन झाले.

सरकारांना विरोध : जगातील २८ देशांमध्ये सरकारविरोधात निदर्शने

  • अॉक्टोबर : चिलीत दोन महिन्यांपासून सरकारविरोधी आंदोलन सुरू आहे. सामाजिक असमानतेविरोधात लोक रस्त्यावर आहेत. पोलिस रबराच्या गोळ्या चालवत आहेत. यात २४१ पेक्षा जास्त लोकांच्या डोळ्याला इजा झाली तरीही ते मास्क घालून आले.
  • वर्षभर इराक, व्हेनेझुएला, लेबनॉन, फ्रान्स, इंडोनेशिया, स्पेन, ब्राझीलसह सुमारे २८ देशांमध्ये सरकारविरोधात आंदोलन झाली.

टंचाई : ऑस्ट्रेलियात आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान, जलसाठे आटले

  • मार्चमध्ये फ्रान्समध्ये इंधन महागल्याने पॅरिसमध्ये झालेल्या येलो वेस्ट आंदोलनाची चर्चा. देशभर पसरल्याने सरकारने निर्णय मागे घेतला.
  • जानेवारी-फेब्रुवारी: ऑस्ट्रेलियात तापमानाने यंदा सर्व विक्रम मोडले. सरासरी तापमान ४२ अंश राहिले. बहुतांशी जलसाठे आटले. पाणी नसल्याने हिंसक झालेल्या ५५ जंगली घोड्यांना गोळी घालावी लागली.
बातम्या आणखी आहेत...