आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

.... अन्यथा महिलादिनी माेठे आंदाेलन; प्रसूती सुविधा, समानतेच्या मागणीवरून मोठी रॅली

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

माद्रिद : स्पेनच्या अनेक शहरांत महिलांनी समानतेसाठी मंगळवारी रॅली काढली. रुग्णालयात प्रसूतीसाठी आवश्यक सुविधांत वाढ करण्याची मागणी या आंदाेलक महिलांनी या वेळी केली. वेरिन व पाँटेवेंद्रासारख्या गावांतील रुग्णालयांत महिलांना प्रसूतीसाठी स्वतंत्र वाॅर्डदेखील नाही. रॅलीत सहभागी होण्यासाठी स्पेनच्या विविध प्रांतांतून ३० बसने महिला येथे पोहोचल्या होत्या. महिलांवरील अत्याचार व हिंसाचार रोखण्यासाठी कडक कायदा करण्याची मागणीही आंदोलकांनी केली. रॅलीचे नेतृत्व करणाऱ्या अरोना सोला म्हणाल्या, देशभरातील आंदोलनात ३० हजारांहून जास्त महिलांनी एकजूट दाखवली आहे. त्यावरून आमची ताकद कमी नसल्याचे स्पष्ट होते. आमच्या मागण्यांकडे कानाडोळा करू नका. त्यावर विचार केला गेला नाहीतर ८ मार्चला महिलादिनी व्यापक आंदोलन केले जाईल, असा इशारा सोला यांनी दिला. 

वेतन पुरुषांपेक्षा २० हजारांनी कमी : स्पेनमध्ये महिला-पुरुषांच्या वेतनात तफावत आहे. महिलांना पुरुषांच्या तुलनेत ३७ हजार रुपये एवढे कमी निवृत्तिवेतन मिळते. त्याशिवाय वेतनात सरासरी २० हजारांचे अंतर दिसून येते. व्यवस्थापनातील पदांवर महिलांचे प्रमाण ३० टक्क्यांनी कमी आहे.