आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Big Send Of From Farmers To Inspectors Of Sugar Factories

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकऱ्यांनी दिली १५ लाखांची कार, अडीच लाखांची बुलेट; १० लाख रु. व हुक्का

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देवेंद्र शर्मा 

सोनिपत - हरियाणातील सोनिपत येथे ५०० शेतकऱ्यांनी साखर कारखान्याचे इन्स्पेक्टर महाबीरसिंह आंतिल यांचा निवृत्तीबद्दल भव्य सत्कार केला. या वेळी त्यांना १५ लाखांची कार व अडीच लाखांची बुलेट तर दिलीच, शिवाय दहा लाख रुपये राेख व हुक्काही भेट म्हणून दिला. एवढेच नव्हे तर राई मतदारसंघाचे आमदार मोहनलाल बडोली यांनी स्वत:च्या कारमधून त्यांना सोडण्यासाठी घरी  गेले. महाबीर यांनी या कारखान्यांवर ३५ वर्षे नोकरी केली. त्यानंतर सेवानिवृत्त झाले. साखर कारखान्यात ते निरीक्षक होते. त्यांचे सर्वांशीच चांगले वर्तन राहिले. 
 या वेळी बोलताना महाबीर म्हणाले, शेतकऱ्यांचे मला खूप आशीर्वाद मिळाले. सरकारी नोकरीत काम करताना वेळेचे बंधन पाळले नाही. शेतकरी बंधूंनी दिलेल्या या प्रेमाच्या भेटी घेण्यास मी स्पष्ट नकार दिला. पण त्यांनी माझे ऐकले नाही. या वेळी ५०० हून अधिक शेतकरी व अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी हा सामाजिक बंधुभावाचा समारंभ असल्याचे म्हटले. माझे कार्य ऊस लागवड चांगली व्हावी याकडे लक्ष देण्याचे  होते. शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचा ऊस लागवड करण्यासाठी बेणे घेऊन देण्याचा प्रयत्न होता. दोन वेळा निलंबितही

महाबीर म्हणाले,   मी गावागावांत जाऊन सरकारी योजनांची माहिती देत होतो. कारखान्यात काही तांत्रिक बिघाड झाल्यास शेतकऱ्यांनी ऊस आणू नये म्हणून सावध करत होतोे. कारखाना सुरू झाल्यानंतर त्यांना कळवत होतो. त्यामुळे शेतकऱ्यांशी माझे संबंध खूप चांगले राहिले. मला दोन वेळा निलंबितही करण्यात आले होते. परंतु शेतकऱ्यांनी मला साथ दिली.