आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Big Technical Mistake A 79 Year Old Becomes A Young Man Of 25; Now The Battle For Pensions Begins

मोठी तांत्रिक चूक : ७९ वर्षीय वृद्ध झाला पंचविशीचा तरुण; आता पेन्शनसाठी लढाई सुरू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गणेश यांचे नवे आधार कार्ड. - Divya Marathi
गणेश यांचे नवे आधार कार्ड.

भिलवाडा - देशातील सर्वात महत्त्वाकांक्षी ओळख योजना चालवणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन अॅथाॅरिटी आॅफ इंडियाचा (यूआयडीएआय) दावा आहे की, जर तुमच्याकडे आधीपासून आधार कार्ड असेल तर तुम्ही दुसरे आधार बनवू शकत नाही. फक्त दुरुस्ती करू शकता. पण भकांदा गावातील ७९ वर्षीय गणेश यांच्याकडे मात्र दोन आधार आहेत.

गणेश यांच्या बोटांचे ठसे एवढे पुसट झाले होते की, कुठलेही यंत्र ते ओळखू शकत नव्हते. मोतीबिंदूनंतर डोळ्यात लेन्स लावल्या तर रेटिनानेही आधार मशीनला धोका दिला. गणेश पेन्शनसाठी बँकेत गेले तेव्हा मशीनने ओळख पटवण्यास नकार दिला. त्यांचा मुलगा भैरू त्यांना घेऊन कलेक्ट्रेटमधील जिल्हा आधार केंद्रात गेले. पण अधिकाऱ्यांनी हात झटकले. प्रगती मैदानावरील केंद्रात त्यांच्या बोटांचे ठसे आणि रेटिना जुळवण्याचा प्रयत्नही अयशस्वी ठरला. तेव्हा कुठलीही चौकशी किंवा दुरुस्ती न करताच कर्मचाऱ्यांनी गणेश यांना दुसरे आधार कार्ड बनवून दिले. कार्ड तर तयार झाले, पण या कार्डवर त्यांचे वय ७९ वरून २५ वर्षे झाले. दोन्ही आधार कार्डात फोटो आणि नाव सारखेच आहे. पत्ता आणि जन्मतारीख बदललेली आहे. भैरू म्हणाले की, आम्ही आधारच्या दुरुस्तीसाठी गेलो होतो, पण बोटे, अंगठ्याची निशाणी आणि रेटिनाही स्कॅन झाला नाही, त्यामुळे त्यांनी नवे आधार तयार करून दिले. वडिलांचे वयही आता २५ वर्षे झाले आहे. त्यामुळे अडचणी तर येणारच. दोन आधारमध्ये आमची चूक काय आहे? 
 

बातम्या आणखी आहेत...