आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर अशांत असतानाही बहरले पर्यटन; ४ वर्षांत यंदा आले सर्वाधिक पर्यटक!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- औरंगाबादेतील अशांततेमुळे पर्यटकांची संख्या घसरल्याची भीती व्यक्त करणाऱ्यांना सुजाण पर्यटकांनीच चपराक दिली आहे. ८ महिन्यांत कचरा प्रश्नापासून विविध कारणांमुळे शहर धुमसत असताना पर्यटकांना आकर्षित करण्यात औरंगाबाद कोठेही कमी पडलेले नाही. उलट गत ४ वर्षांत सर्वाधिक पर्यटक खेचण्यात औरंगाबाद यशस्वी झाले आहे. विशेष म्हणजे यात देशातील तसेच परदेशी पर्यटकांची संख्याही लक्षणीय आहे. अर्ध्याहून अधिक पर्यटकांनी वेरूळ लेणी आणि बीबी का मकबऱ्याला भेट दिली. 


जानेवारीत कोरेगाव भीमा प्रकरणानंतर निर्माण झालेला तणाव, कचरा प्रश्नामुळे वेठीस धरले गेलेले शहर, मध्यवर्ती शहरात भागात उसळलेली धार्मिक दंगल आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्यात मराठा आरक्षणासाठीच्या बंददरम्यान हिंसाचारामुळे औरंगाबाद शहर अशांत झाले. कचरा प्रश्नामुळे पर्यटकांची संख्या घटल्याचा दावा आमदार सतीश चव्हाण यांनी विधिमंडळात केला होता. पर्यटन व्यवसाय डबघाईला आल्याची भीती वेगवेगळ्या क्षेत्रांतून व्यक्त होत होती. प्रत्यक्षात चव्हाण यांचा दावा आणि व्यावसायिकांची भीती व्यर्थ असून औरंगाबाद अजूनही पर्यटकांचे पसंतीचे ठिकाणी असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. 


जानेवारी ते ऑगस्ट या काळात गेल्या ५ वर्षांत २०१४ वगळता पर्यटक १७,३२,१४१ वरून १७,५३,८४३ वर पोहोचले. याच काळात गतवर्षीच्या तुलनेत यंदा परदेशी पर्यटकांची संख्या२१६१ ने वाढली आहे. 

बातम्या आणखी आहेत...