आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जसलिनचाच Video पाहून लोक उडवताहेत जलोटांशी रिलेशनची खिल्ली, म्हणाले-चिमणी उडून जाणार हे माहिती होते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क - 65 वर्षांचे अनुप जलोटा आणि त्यांच्यापेक्षा 37 वर्षांनी लहान असलेली गर्लफ्रेंड जसलिन मथारू यांची सध्या चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. विशेष म्हणजे जसलिनच्याच एका जुन्या व्हिडिओचा वापर त्यासाठी केला जात आहे. हा व्हिडिओ जसलिनचा चित्रपट डर्टी बॉसमधील आहे. हा चित्रपट 2016 मध्ये आला होता. त्यात जसलिन म्हणत आहे - 'तो विवाहित आहे. माझे दोन्ही चित्रपट झाले की, तो त्याच्या मार्गाने आणि मी माझ्या. तुला काय वाटते. मी त्याच्या जाफ्यात अडकणार नाही. तो म्हातारा आहे. व्हिडिओबाबत सोशल मीडिया यूझर्स अनेक कमेंट्स करत आहेत. कोणी म्हणत आहे की, जसलिनच्या मनात हेच होते. तर कोणी म्हणाले, आम्हाला माहिती होते, चिमणी उडून जाईल. 


बिग बॉस 12 च्या टास्कदरम्यान झाला खुलासा 
बिग बॉस शोमध्ये जसलिनने स्विकारले आहे की, अनुप जलोटांच्या आधी तिने सिंगर सुखविंदर सिंग यांना डेट केले होते. सुखविंदर सिंग जसलिनपेक्षा 19 वर्षांनी मोठे आहेत. त्याबाबत जसलिनने अनुप जलोटांना सांगितले नव्हते. 


जलोटांना माहिती होते 
शोमधील कॅप्टन्सी टास्क सनसनीखेज खुलासादरम्यान जसलिनचे हे सिक्रेट समोर आले. जेव्हा जसलिनचे सिक्रेट समोर आले तेव्हा जलोटा म्हणाले की, त्यांना हे आधीच माहिती होते. त्यांना जसलिनच्या एका फ्रेंडने आधीच याबाबत सांगितले होते, असे ते म्ङणाले. पण त्यांनी जसलिनला हे कधीही कळू दिले नाही, की त्यांना सर्व माहिती आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...