आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bigg Boss 12 Contestant Deepak Thakur Got Three Films And Khatron Ke Khiladi Show Offer

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गेल्या 7 वर्षांपासून बेरोजगार होता हा कलाकार, पण बिग बॉस सीझन 12 नंतर चमकले नशीब; 2012 मध्ये \'गँग्स ऑफ वासेपूर 2\' मध्ये केले होते काम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई : बिग बॉस सिझन 12 मधील स्पर्धक दीपक ठाकूरचे नशीब 'शो'च्या बाहेर पडल्यानंतर उजळले आहे. त्याला एका पाठोपाठ एक नवीन प्रोजेक्ट्स ऑफर केले जात असल्याच्या बातम्या येत आहेत. दीपकला 'बिग बॉस' नंतर 'खतरो के खिलाडी'च्या 10 व्या सीझनसाठी विचारणा करण्यात आली आहे. इतकेच नाही तर दीपकला तीन चित्रपटांच्या ऑफर देखील मिळाल्या आहेत. करणवीर बोहराने दीपकला आपल्या प्रोडक्शन हाऊसमध्ये निर्मीती करत असलेल्या 'हमे तुमसे प्यार कितना' या चित्रपटासाठी गायनाची संधी दिली आहे. या चित्रपटात दीपक स्वतः मुख्य कलाकाराची भूमिका पार पाडणार आहे. दुसरीकडे धवन प्रोडक्शने सुद्धा एका कॉन्ट्रेक्टसाठी दीपकला बोलविले आहे. तसेच श्रीसंथची पत्नी भुवनेश्वरी देखील एक चित्रपट बनवत असून यामध्ये दीपकला गाण्याची ऑफर दिली असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान श्रीसंथने दीपकला आपले 3.90 लाख रूपये किमतीचे शूजचे तीन जोड दिले होते. 'गँग्स ऑफ वासेपूर 2' सारख्या चित्रपटातील गाण्यासाठी आवाज देणाऱ्या दीपकने 'बिग बॉस सीझन 12' मध्ये टॉप 3 पर्यंत मजल मारली होती. पण त्याने ऐनवेळेवर 20 लाख रूपये घेऊन शो मधून माघार घेतली. 


7 वर्षांपासून बेरोजगार होता दीपक 

> प्रसिद्ध दिग्दर्शक अनराग कश्यपच्या एका फोन कॉलमुळे दीपचे आयुष्य बदलले होते. दीपच्या मते. 3 मिनीटे 48 सेकंदाच्या या कॉलमध्ये तो भावून झाला होता. अनुरागने त्याला 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या गँग्स ऑफ वासेपूर चित्रपटासाठी गाण्याची संधी दिली होती. पण या मोठ्या संधीनंतरही दीपक 7 वर्षांपासून बेरोजगार होता.  

> दीपक वयाच्या 12 व्या वर्षी हारमोनियम वाजवणे शिकला होता. दीपकला त्याच्या वडिलांनी खून आधार दिला आहे. त्यांना एकेकाळी दीपकला 350 रूपयांमध्ये तबला आणून दिला होता. 

 

आर्थिक परिस्थितीमुळे दीपने सोडले होते MBA 

> 2017 मध्ये बिहारमध्ये आलेल्या पुरामुळे दीपकच्या परिवाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे त्यांना आपले वडिलोपार्जित घर सोडावे लागले होते. यानंतर पूर्ण परिवार मुजफ्फरपूर येथे स्थायिक झाले. 
> दीपकने मुजफ्फरपूर येथील ऑक्सफोर्ड पब्लिक स्कूलमधून 10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर येथीलच एलपी शाही कॉलमधून 12 वीचे शिक्षण घेतल्यानंतर एलएन मिश्रा कॉलेज ऑफ बिझनेस मॅनेजमेंट येथून BBA चे शिक्षण पूर्ण केले. 

> पण परिवाराची आर्थिक परिस्थितीत ठीक नसल्यामुळे दीपकला MBA तून ड्रॉपआउट व्हावे लागले. यानंतर दीपकने संगीतावर लक्ष केंद्रीत केले. दीपकने डॉक्टर संजय कुमार संजू यांच्याकडून संगीताचे धडे घेतलेले आहे.