आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैत्रिणीच्या EX- बॉयफ्रेंडसोबत लग्न थाटणार आहे बिग बॉस कंटेस्टंट सृष्टी रोडे, भावी नव-यावर लागला आहे 4 मुलींना डेट केल्याचा आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'बिग बॉस 12'मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेली सृष्टी रोडे लवकरच तिच्या मैत्रिणीच्या पुर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडसोबत लग्न थाटणार आहे. जवळजवळ चार वर्षांपूर्वी टीव्ही अभिनेत्री आणि सृष्टीची मैत्रीण असलेल्या मुस्कान अरोराने सृष्टीने तिला दगा दिल्याचा आरोप लावला होता. मनीष नागदेवमुळे मुस्कानने सृष्टीवर आरोप लावला होता. सृष्टीपूर्वी मनीष मुस्कानसोबत रिलेशनशिपमध्ये होता. पण सृष्टीसाठी त्याने मुस्कानसोबतचे नाते तोडले. मुस्कानने सांगितल्यानुसार, मनीषने चार महिलांसोबत अफेअरचे नाटक केले होते. 


मुस्कानने स्वतः सांगितली संपूर्ण कहाणी.... 

- Divyamarathi.com सोबत केलेल्या बातचितमध्ये मुस्कानने सांगितले होते, "मी आणि मनीष रिलेशनशिपमध्ये होतो. मी त्याकाळात 'महाराणा प्रताप' या मालिकेत काम करत होते. शूटिंगसाठी मला वापीला जावे लागत असते, मुंबईपासून येथे जायला चार तास लागत असे. शूटिंगच्या निमित्ताने त्याकाळात मला बराच प्रवास करावा लागत असे. याचकाळात मनीषची जवळीक माझ्या एका मैत्रिणीसोबत वाढली होती, तिचे नाव आस्था चौधरी होते. मनीष कायम माझ्यासोबत खोटे बोलायचे. एकेदिवशी मी त्याला आस्थासोबत रंगेहात पकडले होते. या घटनेनंतर मनीषने माझी माफी मागितली आणि मी त्याला आणखी एक संधी दिली."

 

- "काही दिवसांनी मी हॉस्टिपलमध्ये दाखल झाले होते. त्याकाळात मनीष सृष्टीला डेट करत असल्याचे माझ्या कानावर आले. मला अतिशय वाईट वाटले. मी सृष्टीला फोन केला असता, तिने ही गोष्ट मान्य केली नाही. मी तिच्यावर विश्वास ठेवला. पण काही दिवसांनी त्यांची रिलेशनशिप कन्फर्म झाली. सृष्टीने मला धोका दिला."

 

सृष्टी म्हणाली होती - मी मुस्कानला ओळखत नाही 
- जेव्हा सृष्टीने मुस्कान अरोरावर तिला धोका दिल्याचा आरोप लावला होता, तेव्हा सृष्टी म्हणाली होती, "मी मनीष नागदेवला डेट करत आहे. तो अतिशय चांगला आहे, बाकी येणारा काळच सांगेल तो कसा आहे? मी मुस्कान अरोराला ओळखत नाही. ती आमच्या दोघांवर असे आळ का घेतेय? हे मला ठाऊक नाही. मी या विषयावर फार काही बोलू इच्छित नाही. माझा मनीषवर पूर्ण विश्वास असून तो चांगला जोडीदार आहे."

 

मनीष म्हणाला- मुस्कानने लावलेले सर्व आरोप बिनबुडाचे.. 
- चार वर्षे जुन्या वादावर मनीष म्हणतो, "मुस्कान माझ्यावर जो दगा दिल्याचा आरोप लावला आहे, तो बिनबुडाचा आहे. तिच्याजवळ स्वतःला खरे सिद्ध करण्यासाठी कुठलेही प्रुफ नाही. त्यामुळे मीडियात ही गोष्ट आल्यावर ती गप्प झाली. जेव्हा मी सृष्टीला प्रपोज केले, तेव्हा मुस्कानसोबतच्या रिलेशनशिपविषयी मी तिला सांगितले होते. ही कुठल्याही पद्धतीची टू टायमिंग नव्हती. माझ्या आणि मुस्कानमध्ये जे काही होते, त्याविषयी सृष्टीला सर्वकाही ठाऊक होते. इतकेच नाही तर सृष्टीच्या पालकांनीही आम्हाला पाठिंबा दिला होता. कारण मुस्कानने केलेले दावे खोटे असल्याचे त्यांना पटले होते."

 

आता मुस्कानच्या संपर्कात आहे का मनीष?
आता मुस्कानच्या संपर्कात आहेस का? असा प्रश्न मनीषला विचारला असता, तो म्हणाला, "नाही, मुळीच नाही. मी तिचे नावही घेऊ इच्छित नाही. पण सृष्टीने प्रत्येक गोष्ट अतिशय सामंजस्याने घेतली. जेव्हा एखाद्या पार्टीत मुस्कानसोबत माझा सामना होतो, तेव्हा सृष्टी कायम तिच्यासोबत शांत आणि सकारात्मक असते. आता हा सगळा भूतकाळ झाला आहे. माझी इच्छा आहे की, सृष्टीने बिग बॉसवर लक्ष केंद्रित करावे आणि ती हा शो जिंकावी. ती घरातील इतर लोकांप्रमाणे फेक नाहीये. माझ्या मते, हा शो तिच जिंकेल." 


मनीष आणि सृष्टीचा साखरपुडा झाला असून लवकरच दोघे लग्न करणार आहेत. मनीषने सांगितले, "आमची रोका सेरेमनी झाली आहे. सृष्टी बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर आम्ही लग्नाची तारीख घोषित करु."

बातम्या आणखी आहेत...