आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bigg Boss 12 First Runner Up Sreesanth Bhuvneshwari Kumari Love Story

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Bigg Boss 12 मध्ये सर्वाधिक लाइमलाइट एकवटणारा श्रीसंथ एकेकाळी करणार होता आत्महत्या, पण होणा-या पत्नीमुळे निर्माण झाली होती जगण्याची आस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः 'बिग बॉस 12' (Bigg Boss 12) या रिअॅलिटी शोमध्ये सर्वाधिक लाइमलाइट एकवटणारा श्रीसंथ बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर अधिक प्रसिद्धीझोतात आला. वादग्रस्त क्रिकेटपटू राहिलेला श्रीसंथ मुळचा केरळचा असून टीम इंडियासाठी खेळला आहे. त्याचे प्रोफेशनल आयुष्य उघड्या पुस्तकाप्रमाणे आहे. पण त्याच्या खासगी आयुष्याविषयी फारसे कुणाला काही ठाऊक नाही. श्रीसंथ मॅच फिक्सिंगच्या आरोपात तुरुंगात असताना त्याची पत्नी किचनमध्ये झोपायची. नवरा तुरुंगात जे दुःख भोगतोय, ते वाटून घेण्यासाठी त्याची पत्नी असे करायची. 


रंजक आहे श्रीसंथची Love Story...
सप्टेंबर 2013 मध्ये श्रीसंथवर स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आजन्म बॅन लावण्यात आला होता आणि याच महिन्यात त्याचे भुवनेश्वरीसोबत लग्न होणार होतो. लग्न तर दूरच पण श्रीसंथ जगण्यालाच कंटाळला होता. या कठीण परिस्थितीत त्याची गर्लफ्रेंड असलेल्या भूवनेश्वरीने त्याची साथ सोडली नाही. श्रीसंथने एका मुलाखतीत सांगितले होते, 'बॅन लागल्यानंतर मला पुन्हा खेळायला मिळेल की नाही, याच विचारात मी सतत असायचो. याकाळात मी एवढा डिप्रेशनमध्ये गेलो की आयुष्यच संपवण्याचा विचार मनात डोकावू लागला होता. मग मी आईवडिलांचा विचार केला. पण नंतर मला वाटले त्यांना माझ्याशिवाय आणखी तीन मुले आहेत, त्यामुळे ते माझ्याशिवाय राहू शकतील.' 

 

- श्रीसंथ सांगतो, त्यावेळी मला भूवनेश्वरीच्या वडिलांनी सांगितले होते की नयन (भूवनेश्वरी) या परिस्थितीतही माझ्याशी लग्न करु इच्छिते. मग वाटले, तिच्याशी लग्न न करता मी हे जग सोडून जाऊ शकत नाही. अकेर 12 डिसेंबर 2013 रोजी जयपूरच्या शेखावत कुटुंबातील असलेल्या भूवनेश्वरीसोबत श्रीसंथचे लग्न झाले.


श्रीसंथ तुरुंगात आणि पत्नी किचनमध्ये झोपायची....
स्पॉट फिक्सिंग प्रकरणात श्रीसंथला तुरुंगवास झाला होता. श्रीसंथने एका मुलाखतीत सांगितले होते, 'जेव्हा मी तुरुंगात होतो, तेव्हा पत्नी किचनमध्ये झोपायची. मी तुरुंगात जे दुःख सहन करतोय, ते दुःख अनुभवण्यासाठी ती असे करायची.' श्रीसंथची पत्नी राजस्थानच्या एका रॉयल फॅमिलीतून आहे.


- भुवनेश्वरी श्रीसंथपेक्षा वयाने नऊ वर्षांनी लहान आहे. दोघांनी लग्नापूर्वी सहा वर्षे एकमेकांना डेट केले होते.


- 2015 मध्ये श्रीसंथच्या मुलीचा जन्म झाला, तर 2016 मध्ये तो एका मुलाचा पिता झाला. 


- श्रीसंथ एक उत्कृष्ट डान्सरही आहे. तो रागीट स्वभावासाठी ओळखला जातो. श्रीसंथ अभिनय क्षेत्रातही कार्यरत आहे. 'अक्सर 2' या बॉलिवूड चित्रपटात तो झळकला होता. याशिवाय त्याने काही दाक्षिणात्य चित्रपटांतही काम केले आहे. 


- श्रीसंथने 'कॅबरेट' या चित्रपटातही झळकणार असून हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. चित्रपटात रिचा चड्ढा लीड रोलमध्ये असून पूजा भट याची निर्माती आहे. रिचाच्या अपोझिट चित्रपटात 'हंटर' फेम अभिनेता गुलशन देव आहे.