आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई: सलमान खानच्या 'बिग बॉस' सीजन 12 चे 2 प्रोमो रिलीज झाले आहेत. 16 सप्टेंबर पासून हा शो ऑन एयर होणार आहे. शोमध्ये 21 कंटेस्टंट असतील. यावेळी 3 कॉमनर आणि 3 सेलिब्रिटी जोड्या असतील. या 12 कंटेस्टेंट्स व्यतिरिक्त उरलेल्या 9 लोकांमध्ये 3 सेलिब्रिटी आणि 6 कॉमनर असतील. विशेष म्हणजे यावेळी टीव्ही अॅक्ट्रेस माहिका शर्मा आणि तिचा पोर्न स्टार बॉयफ्रेंड डेनी-डी शोचे सर्वात महागडे कंटेस्टेंट्स बनतील.
बिग बॉस-12 ची हायएस्ट पेड जोडी
- 'बिग बॉस' सीजन 12 मध्ये माहिका शर्मा आणि डेनी-डीची जोडी हायएस्ट पेड असेल. क्लोज सोर्सेजनुसार त्यांना आठवड्याचे 95 लाख रु. दिले जातील.
- ब्रिटिश पोर्न स्टार डेनी (31) याचे माहिरा(24) सोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे. डेनी खुप श्रीमंत आहे, त्याचे स्वतःचे 7 हेलीकॉप्टर आहे आणि स्वतःचे एक प्रोडक्शन हाउस आहे.
टीव्हीचे राम-सीता असतील दूसरे हायएक्स पेड स्टार
- टीव्हीचे राम-सीता म्हणजेच गुरमीत चौधरी आणि देबीना बॅनर्जी शोचे दूसरे हायएस्ट पेड कंटेस्टेंट असतील. दोघंही प्रत्येक आठवड्याला 90 हजार रुपये घेतील.
- देबिना आणि गुरमीतची ओळख 2008 मध्ये 'रामायण' मालिकेच्या सेटवर झाली होती. यामध्ये त्यांनी राम सितेची भूमिका साकारली होती.
- येथेच दोघांची लव्ह स्टोरी सुरु झाली. नंतर त्यांनी 2011 मध्ये लग्न केले. गुरमीत लवकरच जेपी दत्ता यांच्या 'पलटन' मध्ये दिसणार आहे तर देबीना 'तेनाली रामा' मध्ये दिसणार आहे.
तिसरी हायएस्ट पेड जोडी ही मिलिंद-अंकिताची
- बॉलिवूड अॅक्टर मिलिंद सोमन (52) ने याचवर्षी मे महिन्यात 27 वर्षीय अंकिता कंवरसोबत लग्न केले. आता हे नवविवाहित दाम्पत्य 'बिग बॉस' मध्ये दिसणार आहे.
- या दोघांना शोमध्ये येण्यासाठी प्रत्येक आठवड्यात 70 लाख रुपये रक्कम दिली जाईल. मिलिंद आणि अंकिताची ओळख एका नाइट क्लबमध्ये झाली होती. मिलिंद सोमणचे हे दुसरे लग्न आहे.
- मिलिंदने 2006 मध्ये फ्रेंच अॅक्ट्रेस Mylene Jampanoi सोबत लग्न केले होते. परंतू तीन वर्षे एकत्र राहिल्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.