आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss 12 : घराबाहेर झालेल्या नेहावर भडकली आई, नेहा पेंडसे म्हणाली - 'मी नव्हे, श्रीसंथ बेघर व्हायला हवा होता'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः 'बिग बॉस 12'च्या घरातून एविक्ट झालेली नेहा पेंडसे पहिली सेलिब्रिटी ठरली आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर नेहाने divyamarathi.com सोबत बातचित केली. नेहाने आपला रोष व्यक्त करताना म्हटले, 'मी नव्हे तर श्रीसंथ बेघर व्हायला हवा होता.'  अनूप जलोटा आणि जसलीन मथारू यांच्या ब्रेकअप आणि शो जिंकण्यासाठी बनवलेल्या फेक रिलेशनशिपच्या चर्चांवरही पुर्णविराम लावला आहे. नेहा बेघर झाल्याने सोशल मीडियावर यूजर्सनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, घरातून सर्वप्रथम बाहेर आल्याने नेहाची आईसुद्धा तिच्यावर नाराज झाली आहे. नेहाने मुलाखतीत शेअर केल्या अनेक गोष्टी... 

 

श्रीसंथ बाहेर पडायला हवा होता...

नेहाने मुलाखतीत सांगितले, 'एवढ्या लवकर मी बाहेर पडेल, याचा विचारही मी केला नव्हता. बेघर झालेल्यांमध्ये माझे नाव येताच मीच नव्हे तर घरातील इतर मेंबरसुद्धा हैराण झाले. कारण मी चांगला गेम खेळत होते. श्रीसंथला सर्वात कमी वोट मिळाले होते, त्यामुळे तो एविक्ट व्हायला हवा होता. पण त्याला घरात राहण्याची संधी मिळाली.'

 

'माझा चांगुलपणा मला नडला...'

नेहाने मुलाखतीत पुढे सांगितले, 'मला वाटतं, मी खेळात जास्त अॅग्रेसिव्ह नव्हते. खासगी आयुष्यात मी शांत असून भांडणे हा माझ्या स्वभावात नाही. माझा चांगुलपणा मला नडला. घरातून बाहेर आल्यानंतर आता मला असं वाटतंय की, काही गोष्टी अशा घडल्या ज्याच्याविरोधात मी आवाज उठवायला हवा होता. लोकांनी माझ्यावर कमेंट्स केल्या, पण त्याकडे दुर्लक्ष केले. पण आता वाटतं की, घरात टिकून राहण्यासाठी मला माझी फेक इमेज दाखवायला हवी होती.'

 

दीपिका कक्कड खेळतेय स्मार्ट गेम...

नेहा म्हणाली,  दीपिका घरात चांगला गेम खेळतेय. एकीकडे ती घरातील सदस्यांची काळजी घेतेय, तर दुसरीकडे लोक तिच्या फेव्हरमध्ये राहावेत, म्हणूनही ती काम करत आहेत. मी तिच्यावर खूप विश्वास ठेवला, तीच माझी चुक झाली. ती खरा चेहरा दाखवतेय, की फेक हे मला ठाऊक नाही. पण इतरांकडून सहानुभूमी कशी मिळवावी, हे तिला चांगलेच माहित आहे.

 

फेक नाहीये अनूप-जसलीन यांची रिलेशनशिप...

नेहाने सांगितले - मला वाटतं नाही की, अनूप आणि जसलीन यांचे नाते खोटे आहे. ते दोघेही मॅच्युअर आहेत आणि एकमेकांवर प्रेम करातात. त्यांच्या नात्यावर उमटत असलेल्या प्रतिक्रियांमुळे मी सहमत नाही. एका टास्कदरम्यान दोघांमध्ये ब्रेकअप झाले होते, पण ते शोपुरते फेक होते.

 

कपिल शर्मासोबत काम करण्याची इच्छा...

नेहा म्हणाली - कपिल शर्मासोबत मी काही महिन्यांपूर्वी काम केले होते. पण काही गोष्टी जुळून आल्या नाहीत आणि शो बंद झाला. पुन्हा संधी मिळाल्यास मला त्याच्यासोबत काम करायला नक्की आवडेल, तो एक टॅलेंटेड व्यक्ती आहे. 

 

नेहावर भडकली आई...
नेहाने सांगितले, घरातून बाहेर पडल्यानंतर मी सर्वप्रथम माझ्या आईला फोन केला. मला वाटलं, मी बाहेर आल्याने आई आनंदी असेल. पण अगदी उलट घडले. आई फोनवर मला म्हणाली, तू एवढ्या लवकर का घराबाहेर पडली? हे काय केले. मी आईला विचारले, मम्मी माझा आवाज ऐकून तुला आनंद झाला नाही का? पण तिने माझे काहीही ऐकून न घेता, फक्त तू एवढ्या लवकर घराबाहेर पडायला नको होते, असे म्हटले. 

 

सोशल मीडियावर कमेंट्स
नेहा शोमधून बाहेर पडल्यानंतर तिचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त करत आहेत. एका यूजरने ट्वीटरवर लिहिले, 'हे योग्य नाही, आम्ही नेहा हवी आहे.' एका यूजरने लिहिले, 'नेहा पुन्हा बिग बॉसमध्ये यावी, ही माझी इच्छा आहे.' 

I want this cutest kiddo back in the house 😭 & damn you @BiggBoss
bring her back & undo your biggest mistake ever done in all these seasons & she deserves to stay in house #BiggBoss12#BB12

We Love Nehha@NehhaPendse@ColorsTV @EndemolShineIND

EC- insta pic.twitter.com/wdtXmoYYc8

— neнυυ 🍂 (@SweetsPOILSmea) October 14, 2018

Such a unfair decision by @BiggBoss @ColorsTV evicted the contestant #NehhaPendse who played such a beautiful game and saved the contestant who got least vote now #BiggBoss12 watch ur own show wd ur team coz u lost so many viewers by playing such disgusting game#BringBackNehha

— Shubham Chahal (@_ShubhamChahal) October 14, 2018

This Is Unfair
We Love Nehha 😭😭😘😘
#BB12 @ColorsTV #NehhaPendse #BiggBoss12

— vijay sharma (@vijay13059) October 14, 2018
;

 

बातम्या आणखी आहेत...