आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

65 वर्षीय अनूप जलोटा आणि 28 वर्षीय जसलीन यांच्यात खरंच अफेअर आहे का, की पब्लिसिटीसाठी करत आहेत फक्त ड्रामा?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


एंटरटेन्मेंट डेस्कः 'बिग बॉस 12' हा वादग्रस्त रिअॅलिटी शो छोट्या पडद्यावर दाखल होऊन पाच दिवस झाले आहेत. या पाच दिवसांत सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक चर्चा एकवटली ती 65 वर्षीय गझल गायक अनुप जलोटा आणि 28 वर्षीय जसलीन मथारु यांनी. शोच्या प्रीमिअरवेळी रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली या दोघांनी नॅशनल टेलिव्हिजनवर दिली होती. गेल्या साडे तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचेही त्यांनी सांगितले होते. या दोघांचे नाते कळल्यानंतर जसलीनच्या वडिलांना मोठा धक्का बसला आहे. पण आता अनूप जलोटा आणि जसलीन माथारु केवळ पब्लिसिटीसाठी रिलेशनशिपमध्ये असल्याचा ड्रामा करत असल्याचे म्हटले जात आहे. आता यात एक नवीन ट्वीस्ट येणार आहे. दोघे खरंच एकमेकांच्या प्रेमात आहेत की, फक्त ड्राम करत करत आहेत, यावरुन लवकरच पडदा उचलला जाणार आहे.  दोघांच्या रिलेशनशिपविषयी शोचा होस्ट सलमान खान रुची घेत आहे.

 

सलमानला जाणून घ्यायचे आहे दोघांच्या नात्याचे सत्य
अनूप जलोटा आणि जसलीन यांच्या नात्याचे सत्य शोधून काढण्यासाठी शोचा होस्ट सलमान खानने शोच्या क्रिएटिव्ह टीमला एखादी अशी अॅक्टिव्हिटी प्लान करायला सांगितली आहे, ज्यातून दोघांना एकांतात एकमेकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. 

 

- एकत्र राहिल्यानंतर हे दोघे कपल म्हणून एकमेकांसोबत कसे वागतात, याचे निरीक्षण सलमान खानला करायचे आहे. हे दोघे खरंच एकमेकांना डेट करत आहेत की फेक रिलेशनशिपमध्ये आहेत, याचा उलगडा सलमानला करायचा आहे. 

 

दोघांसाठी प्लान केली जाणार डिनर डेट
शोच्या क्रिएटिव्ह टीम दोघांसाठी घरात एक डिनर डेट प्लान करणार आहे. यात प्रेक्षकांना सगळा मसाला बघायला मिळणार आहे. हा टास्त दोघांना कधी देण्यात येणार, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. आता सलमानच यांच्या रिलेशनशिपविषयी जाणून घेण्यास उत्सुक आहे, म्हटल्यावर शोमध्ये फूल ड्राम बघायला मिळणार हे नक्की.  

बातम्या आणखी आहेत...