आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस 12 : सैय्या.. भैय्या.. प्रकरणाने खवळला दीपिकाचा नवरा शोएब, ट्वीटरवर लिहिले ओपन लेटर.. म्हणाला तुमच्या बायकोला, बहिणीला असे म्हणून बघा..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेता शोएब इब्राहीम 'बिग बॉस'च्या घरात असलेली त्याची पत्नी दीपिका कक्कड बरोबर झालेल्या गैरवर्तनामुळे संतापला आहे. त्याने ओपन लेटरच्या माध्यमातून त्याचा राग व्यक्त करत, तिची खिल्ली उडवणाऱ्या दोघांना सडेतोड उत्तर दिले.

 

'बिग बॉस 12' मध्ये सहभागी स्पर्धकांनी दीपिकाचा मानलेला भाऊ श्रीसंत आणि पती शोएब इब्राहीम तुलना केल्याने तिचा राग अनावर झाला. 'बिग बॉस'मध्ये एका टास्क दरम्यान रोमील चौधरी आणि श्रृष्टी रोडे यांनी दीपिकाच्या चेहऱ्याला मुखवटा लावला. त्यानंतर रोमिलने श्रृष्टीला प्रश्न केला. "सैय्या और भैया मेसे आपको क्या पसंद है" असे रोमीलने विचारले तेव्हा उत्तर देताना श्रृष्टीने सांगितले, "सय्या मेरे तन मन में है, और भैया मेरे धन-धन मे.. श्रृष्टी आणि रोमीलचे हे कमेंट्स दीपिकाला सहन झाले नाही. तिने दोघांनाही खडसावले. यानंतर दीपिकाचा पती शोएबनेही दोघांवर टीका केली. 

 

शोएब म्हणाला- स्वत:च्या भावा-बहिणीची तुलना पती-पत्नीशी करा 

> दीपिकाला पाठिंबा देत शोएब इब्राहीमने सोशल मीडियाच्या माध्यमातून रोमील आणि सृष्टी यांना चांगलेच फटकारले आहे. शोएबने ट्वीटरवर लिहले, 'बिग बॉस'मध्ये दीपिका सर्वांसोबत चांगली असूनही तिच्या भावनांची खिल्ली उडवली गेली. एका टास्कच्या माध्यमातून तिच्या भावना दुखावल्या. एखाद्या शोमध्ये पती आणि भावाची तुलनाच कशी केली जाऊ शकते?' असा प्रश्न विचारत तो म्हणाला की, असे करणाऱ्यांनी  स्वत:च्या भावा-बहिणीची तुलना पती-पत्नीशी करावी, तेव्हा कोणावर काय परिणाम होतो हे समजेल. 

 

#ImWithDipika pic.twitter.com/DgMovngcB8

— Shoaib Ibrahim (@Shoaib_Ibrahim1) November 18, 2018

 

समोर आला हळदी समारंभाचा व्हिडिओ

हा वाद सुरू असताना दीपिका आणि शोएबच्या हळदी समारंभाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओत दोघेही हळद समारंभ एन्जॉय करताना दिसत आहे. सुत्रांनुसार शोएब आणि दीपिका यांनी 'ससुराल सिमर का'मध्ये सोबत काम केले आहे. या शो दरम्यान दोघांचे अफेअर सुरू झाले होते. त्यानंतर दीपिकाने 22 फेब्रुवारी 2016 रोजी धर्म परिवर्तन करुन शोएबसोबत लग्न केले होते. त्यानंत सोशल मीडिया यूझर्सनी तिला ट्रोल केले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...