आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ज्या चॅनलवर प्रसिध्द होऊन दीपिका कक्कड बनली 'Bigg Boss 12' विजेती, आता पैशांसाठी नाकारले त्याचे 4 शो 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. 'बिग बॉस 12' ची विजेती ठरल्यानंतर दीपिका कक्कड आता वेगळ्या उंचीवर पोहोचली आहे. एन्टटेन्मेंट इंडस्ट्रीमध्ये तिला सतत नवनवीन ऑफर मिळत आहेत. यामध्ये डेली सोप, रियलिटी शोपासून वेब सीरिज यांचाही समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार गेल्या एका महिन्यापासून दीपिका स्क्रिप्ट्स वाचत आहे आणि खुप विचार करुन डेली सोपमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आहे, ही मालिका स्टार प्लसवर टेलीकास्ट होणार आहे. 


दीपिकाने नाकारली कलर्सची ऑफर 
- दीपिका दोन चॅनल कलर्स आणि स्टार प्लस यांच्यामध्ये कन्फ्यूज होती. दोन्ही चॅनलने तिला डेली सोपसाठी ऑफर दिली होती. या डेलीसोप अॅक्ट्रेससाठी एकदम परफेक्ट होत्या. दोघांची कॉन्सेप्ट इंट्रेस्टिंग होती, पण यामध्ये पैशांचाही फॅक्टर होता आणि यामध्ये विजय पैशांचाच झाला. सूत्रांनुसार, "दीपिकाला कलर्सने एक नाही, तर चार शो ऑफर केले होते. यामधून दोन प्रोजेक्ट इंट्रेस्टिंग होते. तर दूसरीकडे स्टार प्लनेही तिला एका डेली सोपसाठी ऑफर दिली होती. हे ते ग्रँड लेव्हलवर लॉन्च करण्याचा प्लानिंग करत होते. चॅनलने आश्वासन दिले आहे की, हा एक महिला-केंद्रीत शो असेल. खुप जास्त विचार केल्यानंतर दीपिकाने अखेर स्टार प्लसच्या शोसाठी होकार दिला आहे आणि कलर्स चॅनलच्या चारही ऑफर नाकारल्या आहेत. पण अजून फायनल अॅग्रीमेंट होणे बाकी आहे."

 

स्टार प्लसने दिली जास्त पैशांची ऑफर 
दीपिकाने स्टार प्लसच्या शोची निवड केली कारण तिला तिथे जास्त पैसे मिळत आहेत. एका सूत्राने खुलासा केला की, "नवीन शोसाठी तिला प्रतिदिवस 80 हजार रुपयांची ऑफर स्टार प्लसने दिली होती. तर कलर्स चॅनलने प्रतिदिवस 50 ते 60 हजारांची ऑफर दिली होती. यामुळे तिने जास्त पैशांची निवड केली." पण याप्रकरणी अजून दीपिकाने कोणतेही ऑफिशियल स्टेटमेंट दिलेले नाही. दीपिका गेल्या महिन्यात कलर्स चॅनलच्या 'बिग बॉस 12'ची विजेती ठरली. तिला बक्षीस म्हणून 35 लाखांची रक्कम मिळाली होती. यापुर्वी ती कलर्सचा शो 'ससुराल सिमर का'मुळे प्रसिध्द झाली होती. शोमध्ये तिच्या प्रमुख भूमिकेला प्रेक्षकांची खुप पसंती मिळाली होती.


 

0