आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रश्मी देसाईने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव, म्हणाली - वयाच्या 16 व्या वर्षी माझा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला होता

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः 'बिग बॉस 13'मध्ये स्पर्धक म्हणून दिसलेल्या टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईने तिचा कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. एका पुरुषाने तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती फक्त 16 वर्षांची होती, असं ती सांगते. रश्मीच्या म्हणण्यानुसार त्या वेळी ती या क्षेत्रात नवखी होती. 

'विनयभंग करण्याचा प्रयत्न करणारा पहिला माणूस'

पिंकविलाबरोबर बोलताना रश्मी म्हणाली, "मला आजही आठवते, मी 13 वर्षांपूर्वी जेव्हा करिअरला सुरुवात केली त्यावेळी वयाने आणि अनुभवाने लहान होते. तसंच माझ्या कुटुंबाला कलाविश्वाचा वारसाही नव्हता. त्यामुळे माझा स्ट्रगल सुरु होता. याच दरम्यान, जर तू कास्टिंग काऊचचा सामना केला नाहीस तर तुला कधीच काम मिळणार नाही, असं सूरज नामक व्यक्तीने मला सांगितलं होतं. आता तो कुठे असतो, काय करतो याविषयी मला काहीच माहित नाही. परंतु सुरुवातीला त्याने मला स्टॅटिस्टिक्सबद्दल विचारलं. खरं तर मला तेव्हा त्याचा अर्थ माहित नव्हता. इतकंच नाही तर मला या गोष्टींची कल्पना नाही हे त्याला माहित होतं.'

'ऑडिशनच्या बहाण्याने बोलवून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला'

रश्मीच्या म्हणण्यानुसार, त्या व्यक्तीने मला एकदा  ऑडिशनसाठी बोलावलं. मीदेखील त्याच्यावर विश्वास ठेऊन गेले. मात्र तेथे गेल्यावर माझ्या लक्षात आलं की आमच्या दोघांव्यतिरिक्त तिथे कोणीच नाहीये. फक्त एक कॅमेरा होता. त्याने माझ्या ड्रिंकमध्ये अमली पदार्थ मिसळून मला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. मी सतत त्याला मला हे असलं काही करायचं नाहीये हे सांगत होते.जवळपास दोन तास त्याच्याशी याविषयावर वाद घातल्यानंतर मी तेथून सुखरुप बाहेर पडले. 

'आईने रेस्तराँमध्ये बोलवून त्याला थापड मारली'


रश्मीने सांगितल्यानुसार, घरी गेल्यानंतर तिने घडलेला सगळा प्रकार आपल्या आईला सांगितला.  त्यानंतर आईने त्या माणसाला एका रेस्तराँमध्ये भेटण्यास बोलावले. तो माझ्या आईला भेटायला आला, तेव्हा तिने त्याच्या कानशिलात लगावली होती आणि सक्त ताकीद दिली होती.

बातम्या आणखी आहेत...