आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरती सिंहच्या बलात्काराच्या खुलश्यावर वहिनी कश्मीरा म्हणाली, 'मला आणि कृष्णाला असे काही घडले हे माहित नव्हते'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्कः बिग बॉस 13 ची स्पर्धक आरती सिंहने नुकताच या कार्यक्रमात धक्कादायक खुलासा केला की, वयाच्या 13 व्या वर्षी तिच्यावर घरात बलात्काराचा प्रयत्न झाला होता. तिचे हे म्हणणे ऐकून सर्व स्पर्धकांना धक्का बसला होता. आरतीने केलेल्या या खुलाश्यावर तिची वहिनी कश्मीरा शहाने प्रतिक्रिया दिली आहे.

पिंकविला बरोबर बोलताना कश्मीरा म्हणाली की, "मी खूप दु: खी आहे, कृष्णा आणि मला याबद्दल काहीच माहिती नव्हती. आरतीशी बोलल्यानंतरच या प्रकरणात मी आणखी काही सांगू शकेन. हे ऐकून मला फार वाईट वाटले. आरतीने यापूर्वीच आम्हाला याबद्दल सांगायला हवे होते, ज्याने तिच्याशी गैरवर्तन केले, त्याचा मी जीव घेतला असता. मी अशा व्यक्तींपैकी एक आहे, जे पीडितांसोबत उभे असतात. मला माहितच नव्हते की, अशी एक पीडित आमच्या कुटुंबातच आहे." कश्मीरा ही आरतीचा भाऊ कृष्णा अभिषेकची पत्नी आहे.

आरतीच्या नोकराने केला होता बलात्काराचा प्रयत्नः जेव्हा 'छपाक'ची टीम चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिग बॉस 13 या कार्यक्रमात आली होती, तेव्हा आरतीने या घटनेचा खुलासा केला. तिने सांगितले की, “वयाच्या 13 व्या वर्षी माझ्या नोकराने घरात माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. मला ही गोष्ट पारसला सांगायची होती. कारण तो मला संवेदनशील वाटला, मी पारसला सांगितले होते की, मी एकटी झोपू शकत नाही आणि जेव्हाही मी झोपते तेव्हा मी दार बंद करून झोपते. हे सर्व सांगताना माझे हात थरथर कापत आहेत. मी या व्यासपीठावर हे उघड करत आहे, कारण बर्‍याच मुली हा कार्यक्रम  बघतात आणि जेव्हा त्यांच्याबरोबर असे काही घडते तेव्हा त्यांनी आवाज उठवला पाहिजे, असे मला वाटते.''

आरती ही गोविंदाची भाची आहे : आरती (वय 35) ही विनोदवीर कृष्णा अभिषेकची बहीण आणि अभिनेता गोविंदाची भाची आहे. आरतीने 2007 मध्ये टीव्ही शो 'मायका'ने आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात केली होती. यानंतर ती 'गृहस्थी - थोडा है बस थोडे की जरुरत है'मध्ये काम केले. एकता कपूरच्या 'परिचय - नई जिंदगी के सपने का' मधून आरतीला ओळख मिळाली. 

यानंतर, ती 'उतरन', 'देवों के देव महादेव' सारख्या कार्यक्रमांमध्ये देखील दिसली. आरतीने 'किलर कराओके-अटका तो लटका', 'कॉमेडी क्लासेस', 'कॉमेडी नाइट्स बचाओ' या कार्यक्रमांमधून कॉमेडीमध्येही हात आजमावला. 2016 मध्ये ती 'ससुराल सिमर का', 'वारिस' सारख्या शोमध्ये देखील दिसली होती.