• Home
  • TV Guide
  • 'Bigg Boss 13': Salman Khan revealed that contestant will reach the final in four weeks

Bollywood / 'बिग बॉस 13' : चार आठवड्यातच फायनलमध्ये पोहोचणार स्पर्धक, सलमान खानने केला खुलासा  

या सीजनमध्ये सर्व सेलेब्रिटी स्पर्धकच असणार आहेत

दिव्य मराठी वेब

Sep 08,2019 04:53:46 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : वादग्रस्त रिऍलिटी शो 'बिग बॉस सीजन 13' लवकरच सुरु होणार आहे. अशात सलमान खान हळू हळू शोबद्दल अनेक खुलासे करत आहे. अशातच चॅनलने शोचा एक नवा प्रोमो रिलीज केला आहे. यामध्ये सलमान 'बिग बॉस 13' च्या टि्वस्ट अँड टर्नबद्दल सांगत आहे. सलमानने सांगितले की, चार आठवड्यातच स्पर्धक फिनालेमध्ये कसे पोहोचणार आहे. या टि्वस्टबद्दल बोलताना सलमान टायमर ग्लासच्या आत बंद दिसत हे. त्यामध्ये तो टायमिंग आणि फिनालेबद्दल बोलत आहे. शोमध्ये 4 आठवड्यानंतरच विनर ट्रॉफीसाठीचे युद्ध सुरू होईल. यामध्ये स्पर्धकांनाच विश्वास परखला जाईल. या सीजनमध्ये सर्व सेलेब्रिटी स्पर्धकच असणार आहे.

मेकर्सने यावेळी कॉमनर्सला न आणण्याचा निर्णय घेतला आहे. अशात फॅन्स उत्साहित आहेत की, यावेळी कोणते कोणते सेलेब्रिटीज येतील. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता विशाल आदित्य आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड मधुरिमा तुली यांना देखील शोसाठी अप्रोच केले गेले आहे. सध्या 'नच बलिये 9' चा भाग आहेत. आतापर्यंत शोचे दोन प्रोमो रिलीज केले गेले आहेत. यापूर्वीच्या प्रोमोमध्ये सलमान स्टेशन मास्टरच्या लुकमध्ये दिसत होता. दुसऱ्या प्रोमोमध्ये सलमानसोबत अभिनेत्री सुरभी ज्योती दिसली होती. यासोबतच घरात अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे आगमन होणार आहे. काही दिवसांपूर्वी आयबी टाइम्स वेबसाइटने आपल्या रिपोर्टमध्ये सात स्पर्धक येणार असल्याची माहिती दिली होती. रिपोर्टमध्ये दावा केला होता की, सात व्यक्तींनी बिग बॉसचे कॉन्ट्रॅक्ट साइन केले काही. मुग्धा गोडसे, सिद्धार्थ शुक्ला, चंकी पांडे, राजपाल यादव, माहिका शर्मा, देवोलीना भट्टाचार्य आणि आदित्य नारायणचे नाव सामील आहे.

X
COMMENT