आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss : कुणी Kiss करताना तर कुणी तासन्तास बाथरुममध्ये होते बंद, जेव्हा स्पर्धकांनी ओलांडल्या मर्यादा, सलमानने सुनावले होते खडे बोल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः 'बिग बॉस'चे 12 वे पर्व लवकरच छोट्या पडद्यावर सुरु होत आहे. गोव्यात शोचा होस्ट सलमान खान शोचे लाँचिंग केले. येत्या 16 सप्टेंबरपासून सुरु होणारा हा शो यंदाही सलमानच होस्ट करणार आहे. टीव्हीवरील हा एक असा शो आहे, ज्यात भरपूर भांडणे, तंटे आणि वाद-विवाद बघायला मिळतात. इतकेच नाही तर अनेकदा शोमध्ये सेलिब्रिटी आपल्या मर्यादा ओलांडताना दिसले आहेत. कुणी एकमेकांना किस करताना तर कुणी इंटीमेट होताना 

नॅशनल टेलिव्हिजनवर दिसले आहेत. आज आम्ही तुम्हाला या शोच्या मागील पर्वातील काही वादग्रस्त स्पर्धकांविषयी सांगत आहोत. 

 

सलमानने सुनावले होते खडे बोल...

- 'बिग बॉस' 11 या सीझनमध्ये बंदगी कालरा आणि पुनीश शर्मा यांच्या हॉट केमिस्ट्रीने प्रेक्षकांना अचंबित केले होते. जेव्हा कॅमे-यासमोर दोघांनी सर्व मर्यादा ओलांडल्या, तेव्हा सलमानने त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. दोघांना अनेकदा घरात इंटीमेट होताना बघितले गेले. इतकेच नाही तर दोघे बराच वेळ बाथरुममध्ये एकत्र राहायचे.

 

- 'बिग बॉस 8' मध्ये जेव्हा मॉडेल आणि टीव्ही पर्सनॅलिटी डिआंड्रा सॉरेस एविक्ट झाली, तेव्हा मीडियात चर्चा होती, की ती प्रेग्नेंसीमुळे शोमधून बाहेर पडली. तिच्या प्रेग्नेंसीचे तार गौतम गुलाटीसोबत जोडले गेले होते. डिआंड्रा आणि गौतम एकमेकांच्या खूप जवळ आले होते आणि अनेकदा दोघे बाथरुममध्ये एकत्र असायचे.

 

- सीझन 7 मध्ये तनीषा मुखर्जी आणि अरमान कोहली यांच्या मैत्रीचीही बरीच चर्चा रंगली होती. दोघांना अनेकदा किस करताना आणि एकमेकांच्या मिठीत बघितले गेले होते. 


- शोच्या सातव्या पर्वात तनीषा आणि अरमान यांच्याशिवाय आणखी एक जोडी चर्चेत राहिली होती. या पर्वात कुशल टंडन आणि गौहर खान एकमेकांकडे प्रेमाची कबुली देताना दिसले होते. झोपायला जाण्यापूर्वी हे दोघे कायम एकमेकांना गुडनाइट किस आणि मूड ऑफ झाल्यानंतर मीठी मारायला मुळीच विसरत नव्हते.

 

- वीणा मलिक आणि अश्मित पटेल बिग बॉसच्या चौथ्या पर्वात एकत्र झळकले होते. घरात दोघे अनेकदा इंटीमेट होताना दिसले होते. मसाजपासून एकमेकांना मिठी मारणे आणि एकत्र बेड शेअर करताना दोघे दिसले होते.  

 

- बिग बॉसच्या इतिहासातील पहिले सीझन अतिशय खास राहिले होते. आर्यन वैद्य आणि अनुपमा वर्मा यांच्या लव्ह स्टोरीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. दोघेही कॅमे-यासमोर क्वॉलिटी वेळ घालवत होते. अनेकदा दोघे इंटीमेट होतानाही दिसले होते. 

बातम्या आणखी आहेत...