Home | TV Guide | Bigg Boss Biggest Fights Between Hina Khan To Kamaal Rashid Khan Till Now

Bigg Boss सर्वात वादग्रस्त स्पर्धक : कुणी केली मारहाण तर कुणी उडवली आईची खिल्ली, सलमानवरही लावण्यात आले गंभीर आरोप

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 10, 2018, 12:46 PM IST

'बिग बॉस'चे 12 वे पर्व लवकरच छोट्या पडद्यावर सुरु होत आहे. गोव्यात शोचे शानदार लाँचिंग झाले.

 • Bigg Boss Biggest Fights Between Hina Khan To Kamaal Rashid Khan Till Now

  एंटरटेन्मेंट डेस्कः 'बिग बॉस'चे 12 वे पर्व लवकरच छोट्या पडद्यावर सुरु होत आहे. गोव्यात शोचे शानदार लाँचिंग झाले. 16 सप्टेंबरपासून सुरु होणारा हा शो यंदाही सुपरस्टार सलमान खान होस्ट करणार आहे. या शोचे पहिले पर्व 200 6मध्ये आले होते आणि सुरुवातीपासूनच शो वादग्रस्त राहिला. कधी शोमध्ये स्पर्धकांनी एकमेकांना शिवीगाळ केली, तर कुणी मारहाण. एकाने तर दुस-या स्पर्धकावर चक्क लघुशंका फेकली होती. divyamarathi.com तुम्हाला सांगत आहे 'बिग बॉस'च्या आतापर्यंतच्या सर्व पर्वातील काही मोठे वाद...

  अभिनेत्रीने केली होती पोलिसांत तक्रार...
  'बिग बॉस'च्या सातव्या पर्वात सर्वात मोठा वाद झाला होता. अभिनेता अरमान कोहली आणि मॉडेल सोफिया हयात यांच्यात भांडण झाले होते. सोफियाने घराबाहेर गेल्यानंतर अरमानच्या विरोधात एफआयआर दाखल केला होता. लोणावाळा पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेला या FIRमध्ये तिने अरमानवर मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा लावला होता. सोफियाच्या सांगण्यानुसार, अरमानने तिच्यावर झाडूने हल्ला केला होता. सोफियाच्या तक्रारीनंतर अरमानला 'बिग बॉस'च्या घरातून अटक करण्यात आली होती, मात्र नंतर त्याला जामीनावर सोडून देण्यात आले होते.

  - बिग बॉसच्या सहाव्या पर्वात इमाम सिद्दिकी घरात भांडणाचे केंद्रबिंदू ठरला होता. त्याने आश्का गोराडियाची भरपूर खिल्ली उडवून तिला त्रास दिला होता. इतकेच नाही तर शोचा होस्टा सलमान खानसोबतही त्याचे तू-तू, मैं-मैं झाले होते.

  - सीझन 11 मध्ये अर्शी खान आणि हिना खान यांच्या जबरदस्त वाद झाला होता. अर्शीने हिनाला शिवीगाळ केला होता. वाद एवढा विकोपाला गेला होता की, हिनाने अर्शीचा घटिया औरत असा उल्लेख केला होता.

  - बिग बॉसच्या 10 व्या पर्वात प्रियांका जग्गाने तर मनू पंजाबीच्या आईच्या निधनाची खिल्ली उडवली होती. तिने गैरवर्तणासोबतच अभद्र भाषेचा वापर केला होता. त्यामुळे सलमानने तिला घराबाहेर काढले होते.

  - स्वामी ओम सीझन 10 चा सर्वाधिक वादग्रस्त स्पर्धक होता. एका टास्कमध्ये स्वामी ओमने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. त्याने एका बाटली लघुशंका केली आणि ती बाटली बानीच्या दिशेने फेकली होती. त्याच्या या वागणुकीमुळे घरातील सर्व जण वैतागले होते. अखेर स्वामी ओमला घराबाहेर काढण्यात आले होते.

  - बिग बॉसचा तीसरा सीझन त्यावेळी वादात आला होता, जेव्हा शोचा स्पर्धक कमाल राशिद खानने दुसरा स्पर्धक रोहित वर्माच्या दिशेने बॉटल फेकली होती. आपल्या हट्टावर अडून बसणा-या राशिदने फेकलेली बॉटल रोहितऐवजी अभिनेत्री शमिता शेट्टीला लागली होती. या घटनेनंतर कमालला शोमधून बाहेर काढण्यात आले होते.

  - बिग बॉसच्या आठव्या पर्वात तर हद्दच झाली होती. कदाचितच 'बिग बॉस'च्या इतिहासात पहिल्यांदा घरातील एखाद्या सदस्याच्या थोबाडित बसली असेल. झाले असे, की पुनीत इस्सरसोबत झालेल्या एका वादावेळी अली कुली मिर्जाने सोनाली राऊत आणि उपेनविषयी आपत्तिजनक टिका केली होती. जेव्हा सोनालीला याविषयी माहित झाले तेव्हा तिने अलीच्या थोबाडित मारली होती. या थप्पडकांडनंतर अलीची तब्येत बिघडली होती. तसेच, 'बिग बॉस'ने सोनालीला सीजनच्या शेवटपर्यंत घरातून बेदखल होण्यासाठी नॉमिनेट केले होते.

  सलमान खानच्या विरोधात एफआयआर
  बिग बॉस 11 च्या घरात सलमान खान आणि जुबैर खान यांच्यातील वाद पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचला होता. घरातून काढून टाकण्यात आल्यानंतर जुबैरने मुंबईतील एंटॉप हिल पोलिस स्टेशनमध्ये सलमान खानविरोधात लेखी तक्रार दिली होती. यामध्ये त्याने सलमानवर वीकेंड का वारमध्ये धमकावल्याचा आरोप लावला होता. जुबैरने त्याच्या तक्रारीत म्हटले होते, की सलमानने मला नॅशनल टीव्हीवर इंडस्ट्रीत काम करु न देण्याची धमकी दिली होती.

Trending