आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्यूशन घेऊन आपला उदरनिर्वाह करणा-या बिग बॉस कंटेस्टेंटचा नवीन लूक, मेकओव्हरनंतर ओळखणेही झाले कठीण : Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. 'बिग बॉस' सीजन 12 ची कंटेस्टेंट राहिलेली उर्वशी वाणीचा मेकओव्हर झाला आहे. उर्वशीचे काही ग्लॅमरस फोटोज सध्या इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. उर्वशी पहिल्यांचा बिग बॉसमध्ये आली तेव्हा तिचा लूक गावातील सामान्य मुलीसारखा होता. पण शो संपल्यानंतर तिने आपला मेकओव्हर केला आहे आणि आता तिला ओळखणेही कठीण झाले आहे. एका फोटोमध्ये उर्वशी रेड कलरच्या ड्रेसमध्ये दिसतेय, तर अजून एका फोटोमध्ये ब्लॅक अँड व्हाइट फोटोमध्ये ती ग्लॅमरस दिसतेय. 

 

ट्यूशन घेऊन उदरनिर्वाह करते उर्वशी 
बिहारमधील समस्तीपुर येथील उर्वशी वाणी सध्या पटनामध्ये राहते आणि ट्यूशन घेऊन आपला उदरनिर्वाह करते. उर्वशीलाही दीपक ठाकुरप्रमाणे सिंगर बनायचे होते. दीपकसाठी ती आपल्या घरातून पळून आली असेही बोलले जाते. दीपकविषयी बोलायचे झाले तर तो शोमध्ये आला तेव्हा त्याचा साधेपणापासून तो ऑडियन्सला आवडला होता. घरात त्याची मोडकीतोडकी इंग्रजी आणि साधेपणाची खुप खिल्ली उडवली जायची. पण आपली गायकी आणि विनोदी स्वभावामुळे त्याने घरातील लोकांच्या मनात स्थान निर्माण केले. यादरम्यान तो उर्वशीपासून दूर गेला आणि फक्त स्वतःचा विचार करुन गेम खेळत राहिला. 

 

कारखान्यात काम करतात उर्वशीचे वडील 
उर्वशीचे वडील एका कारखान्यात काम करायचे. 2 वर्षांपुर्वी कारखाना बंद पडला. त्यांनी खुप हालाकीच्या परिस्थितीत मुलांचे पालन-पोषण केले आणि त्यांचे शिक्षण केले. पण उर्वशीचे अजोबा ड्रेसर आणि आजी नर्स होत्या आणि समस्तीपुरात त्यांचे क्लीनिक होते. 

 

उर्वशीला आता दीपकचा चेहरा पाहायचीही इच्छा नाही 
उर्वशीला विचारण्यात आले की, तु शोमध्ये दीपकवरील प्रेमाची कबुली देणार होती का?, तर यावर उर्वशी म्हणाली होती, "प्रेमाची कबुली देणार नव्हते, पण मला तो आवडायचा. पण जोपर्यंत मी बिग बॉसच्या घराबाहेर होते तोपर्यंत तो मला आवडायचा. घरात गेल्यानंतर मला दीपकचा खरा चेहरा दिसला, हा चेहरा खुप वेगळा होता. यामुळे माझ्या मनातील त्याच्याविषयीच्या भावना संपल्या." उर्वशी पुढे म्हणाली की, दीपक तिचा सर्वात मोठा शत्रू आहे. उर्वशी सांगते की, ज्या व्यक्तीने 'बिग बॉस'च्या घरात मला साथ दिली नाही, तो बाहेर काय साथ देईल. उर्वशीनुसार तिला आता दीपकचा चेहरा पाहण्याचीही इच्छा नाही.


 

बातम्या आणखी आहेत...