आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'Bigg Boss' Fame Actress Reveals Casting Couch; The Shocking Thing Said In The Interview

कास्टिंग काउचबाबत 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने केला मोठा खुलासा; मुलाखतीत सांगितली धक्कादायक बाब

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क - बिग बॉसची माजी स्पर्धक अभिनेत्री एली अवरामने नुकतच बॉलीवूडमधील कास्टिंग काउचबाबत एक चकित करणारा खुलासा केला आहे. तिने केलेले खुलास्यामुळे प्रत्येकजण हैराण झाले आहेत. नोरा फतेही आणि सुरवीन चावलानंतर एली अवरामला कशाप्रकारे याला सामोरे जावे लागले याबाबत एका मुलाखतीत सांगितले. बॉलीवूडमधील बऱ्याच लोकांनी एलीच्या बॉडी शेमिंगसोबत तिच्या कमी उंचीबाबत तिला टोकले. 

एली अवरामने पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत सांगतिले की, 'माझे वजन कमी करण्याची आवश्यकता असल्याचे मला सांगण्यात आले. तर काहींनी तर माझी उंची, कपाळ आणि माझ्या दाताबाबत टोकण्यात आले. तसेच माझी उंची कमी असल्यामुळे मी अभिनेत्री होऊ शकत नसल्याचे बॉलीवुडशी जोडलेल्या एका मुलीने मला सांगतिले. पण मी मात्र त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत राहिले. भारतात दोनच महिने राहिल्यावर मला जाणवले की, मी इथपर्यंत कधी पोहचू शकेल.'

एली पुढे म्हणाली की, 'अनेकांना वाटत होते की मी माझ्या लांबसडक केसांमुळे विवाहीत महिलेसारखी दिसते.' इतकेच नाही तर एलीला बॉलीवुडमध्ये कास्टिंग काउच देखील सामना करावा लागला. 
 
मुलाखतीत तिन सांगितले की, 'मी अऩेकांच्या भेटी घेतल्या. दरम्यान मी दोन दिग्दर्शंची भेट घेतली. त्यांनी माझ्याशी हस्तांदोलन केले आणि माझा हात जोरात दाबला. यात माझे बोट देखील सोलले गेले. त्या भेटीनंतर मी माझ्या मित्राला याबाबत विचारणा केली असता तो हैराण झाला. तो म्हणाला, ओह! नो, त्याने केले का? तुला माहितीये याचा अर्थ काय आहे? पण याबाबत मला काहीच माहीत नव्हते. मित्राने मला सांगितले की, त्याला माझ्यासोबत झोपायचे होते.'
 
मनीष पॉलसोबत 'मिक्की व्हायरस' आणि 'किस किस को प्यार करूं' सारख्या चित्रपटात दिसलेली एली अवराम बिग बॉसमध्ये दिसली आहे.