आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

10 महिन्यांपासून डिप्रेशनचा सामना करत आहे 'बिग बॉस' ची एक्स-कन्टेस्टंट, करियरच्या पीक पॉईंटवरच पॅरालाईज झाला होता अर्धा चेहरा, स्वतः ऐकवली आपली कहाणी 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : कॉन्ट्रोवर्शियल रियलिटी शो 'बिग बॉस 8' मध्ये कन्टेस्टंट म्हणून दिसलेली रेनी ध्यानी एका वर्षपासून डिप्रेशनने ग्रस्त आहे. सध्या सीरियल 'ये तेरी गलियां' मध्ये महत्वाची भूमिका साकारत असलेली रेनी, आर्मी बॅकग्राउंडमधून आली आहे आणि तिच्या वाईट दिवसांमध्ये तिला तिच्या फॅमिलीचा पूर्ण सपोर्ट मिळाला. DainikBhaskar.com सोबत बोलताना रेनीने आपले डिप्रेशन, हाफ फेशियल पॅरालिसिस, पेरेंट्स आणि आजाराबद्दल कळाल्यानंतरच्या पहिल्या प्रतिक्रियेविषयी मोकळेपणाने सांगितले.  

रेनी म्हणाली, 'ते खूप वेदनादाई होते..
"मी अनेक वर्षांपासून या इंडस्ट्रीचा भाग आहे. पण येथे माझा कुणीही मित्र नाही, ज्यांच्यासोबत मी आपले इश्यूज शेयर करू शकेन. मागच्या 10 महिन्यांपासून मी डिप्रेशन, हायपरटेंशन आणि मेंटल इश्यूजचा सामना करत आले आहे. प्रामाणिकपणे सांगायचे तर सुरुवातीला मला काळातच नव्हते कि कसे रिऍक्ट करावे. असे कुणी नव्हते, ज्यांच्यासोबत मी याबद्दल बोलू शकेन. ते खूप वेदनादाईहोते आणि मी स्वतःला इमोशनली खूप त्रास देत होते. जेव्हा मी करियरच्या पीकवर होते, तेव्हा माझा अर्धा चेहरा पॅरालाईज झाला होता. मी 'ये तेरी गलियां' मध्ये काम करत होते, पण अचानक सर्वकाही बदलून गेले."

सेटवर मी उगीच ओरडायचे... 
"प्रोड्यूसर आणि प्रोडक्शन टीमला माहित होते की, माझ्यासोबत काहीतरी चुकीचे घडते आहे. मी सेटवर उगीच ओरडायचे आणि लोकांवर सामान फेकायचे. त्यामुळे लोकांना त्रास व्हायचा आणि वेळी वाया जायचा. मी रडणे सुरु करायचे. सुरुवातीला जे व्हायचे, त्याची मला जाणीव झाली नाही. पण मग प्रोडक्शन टीमच्या काही लोकांनी मला डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला दिला. खरे तर ते लगेच डॉक्टरला सेटवर बोलावून घायचे. सुदैवाने ते माझ्यासाठी खूप सपोर्टिव होते. मात्र मी त्यांना कधी सांगितले नाही की, मी डिप्रेशनने ग्रस्त आहे आणि मेंटली आणि इमोशनली डिस्टर्ब आहे."

मला परत हॅप्पी झोनमध्ये यायचे आहे... 
"मी या सर्वाशी सुमारे 10 महिन्यांपासून सामना करत आहे. पण हेदेखील सांगेन की, मागचे दोन महिने पूर्वीपेक्षा चांगले आहेत. मी स्वतःची काळजी करत आहे आणि डिप्रेशनमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. मला परत हॅप्पी झोनमध्ये यायचे आहे. पब्लिकमध्ये हे सर्व सांगण्याचे कारण लोकांना याविषयी जागरूक करणे आहे की, जर त्यांचा मूड रोज बदलत असतो, ते स्वतःला इमोशनली स्ट्रॉन्ग समजत नाही आणि त्यांनवाटते की, त्यांची मेंटल हेल्थ चांगली नाहीये तर त्यांनी त्वरित डॉक्टरांना भेटले पाहिजे."

पेरेंट्सने वाईट काळातून बाहेर पडायला मदत केली... 
मी आर्मी बॅकग्राउंडमधून आलेली आहे आणि स्वतःला नेहमी स्ट्रॉन्ग पर्सनॅलिटी म्हणून पहाते. पेरेंट्सने मला नेहमी सपोर्ट केला. जेव्हा त्यांनामाझ्या अवस्थेविषयी कळाले तेव्हा ते खूप हादरून गेले होते. माझ्यासारखेच त्यांनाही कळाले नाही की यावर कसे रिएक्ट करावे. पण त्यांनी हार मानली नाही. ते मुंबईला आले आणि माझ्यासोबत राहू लागले. त्यांनी मला माझ्या आयुष्यातील या वाईट काळातून बाहेर पडायला खूप मदत केली. त्यांना याचा अभिमान वाटलं की, एवढे सगळे होऊनही मी आजाराची फारशी जाणीव होऊ दिली नाही. मी त्यांची आभारी आहे."

ललित बिष्टसोबतच्या नात्याबद्द्दलही बोलली... 
ललित बिष्टसोबत माझे रिलेशनशिप खूप खराब होते. आम्हा दोघांचे विचार जुळत नव्हते. मी हे नाही म्हणणार की, त्यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेले होते. पण हो, एक कारण रिलेशनशिपदेखील असू शकते. 

0