आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकलर्स मराठीवरील नवरा असावा असावा तर असा हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आजपर्यंत आपण गृहलक्ष्मींना त्यांच्या इच्छापूर्तीसाठी खेळताना बघितलं पण आता पहिल्यांदाच आपल्या लाडक्या गृहलक्ष्मीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचे नवरे या खेळात भाग घेत आहेत. कार्यक्रमामध्ये आलेल्या जोड्या हर्षदा ताईशी मनमोकळे पणे गप्पा मारतात, त्यांच्या कडू-गोड आठवणी, त्यांचा प्रवास सांगतात. परंतु रविवारच्या भागामध्ये आलेले खास
सदस्य त्यांचा बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवास कसा होता हे सांगणार असून बऱ्याच गप्पा देखील मारणार आहेत. कलर्स मराठीवरील “बिग बॉस मराठी” या कार्यक्रमाने प्रेक्षकांची बरीच लोकप्रियता मिळवली. कार्यक्रमातील सदस्यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवले. याच कार्यक्रमामधील TOP 2 सदस्य म्हणजेच मेघा धाडे, जी बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची पहिली विजेती ठरली आणि पुष्कर जोग या कार्यक्रमामध्ये येणार आहेत. हे दोघेही एकटे येणार
नसून त्यांच्यासोबत असणार आहेत त्यांच्या आयुष्यातील खास व्यक्ती. मेघा धाडे तिच्या नवऱ्यासोबत आणि पुष्कर जोग त्याच्या बायकोसोबत येणार आहे. या दोघांमुळे हा भाग नक्कीच खास होणार यात शंका नाही.
मेघा आणि आदित्य तसेच पुष्कर आणि जास्मिन यांनी बऱ्याच धम्माल गोष्टी यावेळेस हर्षदा ताईबरोबर शेअर केल्या. मेघाने तर या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनाच सांगितले की माझ्याशी भांडला तर मीच जिंकणार त्यामुळे माझ्याशी भांडायचे नाही. तसेच मेघाने आदित्यची तर जास्मिन ने पुष्करची माफी मागितली... का मागितली माफी? हे जाणून घेण्यासाठी 19 ऑगस्ट, रविवारचा भाग नक्की बघा. पुष्कर आणि सईच्या मैत्रीबद्दल काय आहे जास्मिनचे म्हणणे हे देखील प्रेक्षकांना कळणार आहे. मेघा आणि आदित्य, पुष्कर आणि जास्मिन यांनी खूप सुंदर असा डान्सदेखील केला. बिग बॉस मराठीच्या घरातील कडू – गोड आठवणी हे दोघे सांगणार आहे. मेघा आणि पुष्कर शिवाय 100 दिवस रहाणे किती कठीण होते हे त्यांच्या आयुष्यातील प्रिय व्यक्ती म्हणजेच जास्मिन आणि आदित्य प्रेक्षकांना सांगणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.