आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Bigg Boss This Season's Contestant Is Set To Become 9 Celebrities Including Actress Koyna Mitra And Music Composer Wajid Khan.

अभिनेत्री कोयना मित्रा आणि म्यूझिक कम्पोजर वाजिद खानसह हे 9 सेलिब्रिटी बनणार आहेत या सीझनचे कन्टेस्टंट 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस' चे 13 वे सीजन 29 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. सलमान खान यावेळीही शो होस्ट करत आहे. शोच्या अनेक कन्टेस्टंटची नावेही समोर आली आहेत. दैनिक भास्करच्या सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, शोच्या मेकर्सच्या वतीने 9 सेलिब्रिटीजची नावे फायनल झाली आहेत. यांच्याव्यतिरिक्त 3 सोशल मीडिया इन्फ्लूएंसरदेखील असतील. मात्र याची अधिकृत घोषणा प्रीमियर एपिसोडमध्येच होऊ शकते.  


सूत्रांनी कन्टेस्टंटची सांगितली ही नावे... 
1. कोयना मित्
रा : अशातच कोयना तेव्हा चर्चेत होती, जेव्हा तिने आपले गाणे 'साकी-साकी' च्या रीक्रिएट केल्याबद्दल राग व्यक्त केला होता. 2004 मध्ये रिलीज झालेल्या 'मुसाफिर' चित्रपटाने कोयनाने डेब्यू केला होता. त्यानंतर ती 'एक खिलाड़ी एक हसीना', 'इंसान', 'अपना सपना मनी मनी' आणि 'हे बेबी' यांसारख्या चित्रपटातदेखील दिसली होती. 

2. वाजिद खान : म्यूझिक कम्पोजर वाजिद खान 'बिग बॉस 13' मध्ये कन्टेस्टंट म्हणून दिसणार आहे. याचे स्पष्टीकरण फराह खान आणि नेहा कक्कडने एका प्रमोशनल व्हिडिओमध्ये दिले आहे. 

3. रश्मी देसाई : रश्मीला लोक तिची टीव्ही सीरियल 'उतरन' साठी ओळखतात. सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे तिचा बॉयफ्रेंड अरहान खानदेखील या शोमध्ये भाग घेणार आहे. मात्र यावर मेकर्स अद्याप निर्णय घेऊ शकलेले नाही की, तो शोच्या सुरुवातीला घरात एंटर होईल की, मग त्याला नंतर आणले जाईल. 

4. आरती सिंह : आरती बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांची भाची आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेकची बहीण आहे. तिने 2007 मध्ये सीरियल 'मायके' ने टीव्हीवर डेब्यू केला होता. त्यानंतर ती 'गृहस्थी', 'थोड़ा है थोड़े की जरूरत है, 'परिचय', 'उतरन', 'देवों के देव : महादेव' यांसारख्या अनेक शोजचा भाग राहिली आहे. 

5. दलजीत कौर : दलजीत सीरियल 'इस प्यार को क्या नाम दूं' ने लाइमलाइटमध्ये आली होती. तिचे लग्न 2015 मध्ये अभिनेता शालीन भनोटसोबत झाले होते. पण 6 वर्षानंतरच दोघे वेगळे झाले.  

6. सिद्धार्थ शुक्ला : सिद्धार्थ शुक्ला 'बालिका वधू' सिरियलमधील शिव या भूमिकेमुळे ओळखला जाऊ लागला. सिद्धार्थ रस्त्यांवर रॅश ड्रायव्हिंग करण्यापासून ते सेटवर आपल्या सह कलाकारांसोबत गैरवर्तन केल्यामुळेही वादांमध्ये अडकलेला आहे.  

7. देवोलीना भट्टाचार्जी : 'साथ निभाना साथिया' मध्ये गोपी बहूची भूमिका साकारणारी अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी देखील अनेक वादांमध्ये अडकलेली आहे. डिसेंबर 2018 मध्ये मुंबईमध्ये एका मोठ्या हीरा व्यापाऱ्याच्या मृत्यू प्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी तिला ताब्यात घेतले होते. मानले जात होते की, व्यापाऱ्याच्या हत्येचे कारस्थान सचिन पवारने रचले होते, जो त्यावेळी देवोलीनाचा बॉयफ्रेंड होता. मात्र अभिनेत्रीने या आरोपांचे खंडन केले. 

8. अबू मलिक : अबू सिंगर अनु मलिकचा धाकटा भाऊ आहे. त्याने बॉलिवूडच्या जवळपास सर्वच सुपरस्टार, गायक आणि लाईव्ह कलाकारांसोबत जगभरात सुमारे 10,000 शोमध्ये परफॉर्म केले आहे. 

9. शहनाज गिल : शहनाज गिल पंजाब एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमधील खूप प्रसिद्ध नाव आहे. जानेवारी 2019 मध्ये ती तेव्हा चर्चेत आली होती, जेव्हा ती पंजाबी सिंगर हिमांशी खुरानाचे गाणे खराब असल्याचे म्हणाली होती.  

यांच्याव्यतिरिक्त टीव्ही अभिनेत्री माहिरा शर्मा आणि अभिनेता पारस छाबडा यांचीही नावे समोर आली आहेत. मात्र अद्याप यांनी फायनल अग्रीमेंट साइन केलेले नाही.